
देवळा | सोमनाथ जगताप
देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज बुधवार (दि.७) रोजी सरपंच पदासाठी ५५ पैकी २३ उमेदवारांनी माघार घेतल्याने भऊर आणि मटाणे गावातील दोन सरपंचांची बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे. तर सदस्य पदासाठी ३४५ पैकी १३३ उमेदवारांनी माघार घेतल्याने ५० ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे.

फुलेनगर ग्रामपंचायतच्या सातही सदस्यांची बिनविरोध निवड झाली असली तरी येथे सरपंच पदासाठी दुरंगी लढत होणार आहे. आता उर्वरित ११ सरपंच पदासाठी ३० उमेदवार तर १२ ग्रामपंचायतींच्या ७७ सदस्य पदांसाठी १६० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले अशी माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजय सूर्यवंशी, नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिली.
आता उर्वरित जागांसाठी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काही ठिकाणी अखेरच्या क्षणापर्यंत बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यात यश मिळू शकले नाही. माघारीच्या आजच्या अखेरच्या दिवशी देवळा तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सदस्यांची बिनविरोध निवड झालेल्यात
दहिवड- ७, भऊर-६, खामखेडा १, मटाणे -७, डोंगरगाव -८, वाजगाव -१, श्रीरामपूर -३, सटवाईवाडी -५, चिंचवे -३, फुलेनगर -७, वासोळं -२ यांचा समावेश आहे.
सर्वात प्रतिष्ठेच्या अशा मटाणे ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून मोहन पवार तर सदस्य म्हणून सरला केदारे, सुदर्शन वाघ, संदीप ठुबे, गंगाधर केदारे, सीताबाई वाघ, छबुबाई पवार, वैशाली आहिरे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. जवळपास सर्वच उमेदवार बिनविरोध झाले असा अंदाज असताना एका जागेसाठी निवडणूक तर एक जागा रिक्त राहिली आहे.
दहिवड ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडून आलेले सदस्य उमेदवार : निर्मला सोनवणे, मैना अहिरे, वामन ठाकरे, दिगंबर सोनवणे, इंदुबाई अहिरे, लताबाई देवरे, दीपक ठाकरे.
डोंगरगाव ग्रामपंचायतीत सर्वाधिक आठ सदस्य उमेदवार बिनविरोध निवडून आले असून त्यात दत्तू सावंत, रत्नाबाई सावंत, अश्विनी आहिरे, लताबाई हिरे, संगीता निकम, अश्विनी सावंत, मोठाभाऊ पानसरे, संजय सावंत यांचा समावेश आहे. सरपंच व एका सदस्यासाठी प्रत्येकी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
भऊर येथे सरपंच पदासाठी चित्रा मोरे यांची तर सदस्य म्हणून खंडू माळी, विजया माळी, मिना पवार, दादाजी मोरे, गंगाधर ठाकरे, माधुरी माळी यांची बिनविरोध निवड झाली.
बिनविरोध निवड झालेले इतर उमेदवार याप्रमाणे : श्रीरामपूर –
शोभा पवार, वैशाली सावंत, लिलाबाई पवार
खामखेडा – मिनाबाई आहिरे
वाजगाव – केदाबाई आहेर
वासोळ – गोरख भामरे, भिकुबाई पवार
चिंचवे – नानाजी मोरे, नितीन वाघ, दयाराम मोरे
सटवाईवाडी -मनीषा नवले, विलास भामरे, शालीनी चव्हाण, गुलाब पवार, सतीश आहेर.
विठेवाडी, कणकापूर या गावांमध्ये बिनविरोध कुणाचीच निवड न झाल्याने येथे सर्व जागांसाठी निवडणूक होणार असल्याने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
मटाणे ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्यासाठी गावातील सर्व पक्षिय नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळून सरपंचपदासह एकूण आठ जागा बिनविरोध झाल्या. परंतु प्रभाग क्र. ३ मधील जागांच्या माघारी करतांना अनावधानाने झालेल्या चुकीमुळे ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्याचे गावाचे स्वप्न मात्र भंग झाले. प्रभाग क्र. ३ हा अनु.जमाती स्त्री, अनु.जमाती पु., व अनु. जाती असा एकूण तीन जागांसाठी राखीव होता. ह्या प्रभागात अनु.जमाती पु.जागेसाठी तीन उमेदवारांनी आपले नामांकन पत्र दाखल केले होते. परंतु अर्ज माघारीच्या दिवशी अनु.जमाती पु.जागेवरील अनिल बाजीराव पवार, सुकदेव रावण वाघ, साहेबराव पोपट वाघ ह्या सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे हि जागा रिक्त झाली असल्याची माहीती निवडणुक निर्णय अधिकारी अडांगळे यांनी दिली आहे. ह्या प्रभागात अनु.जमाती स्त्री ह्या जागेसाठी अनिता दिपक आहेर, व केदाबाई बाळू सुर्यवंशी यांच्यात लढत होत आहे. अनु. जाती जागेवरील सेजल मुकेश गरूड यांनी माघार घेतल्यामुळे वैशाली आहिरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम