देवळा | सोमनाथ जगताप
तालुक्यात होऊ घातलेल्या १३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी थेट सरपंच पदाच्या उमेदवारी साठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली असून, उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींना साकडे घातले आहे.
ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच व सदस्य पदासाठी १८ डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. यात दहिवड, फुलेनगर, वासोळ, वाजगाव, मटाने, भऊर, खामखेडा, विठेवाडी, डोंगरगाव, श्रीरामपूर, चिंचवे, कनकापूर, सटवाईवाडी या गावातील ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
राज्यात नुकतेच सत्तांतर होऊन शिंदे फडणवीस हे नवीन सरकार स्थापन झाले आहे. सत्तांतरानंतर थेट सरपंच सह सदस्य पदासाठी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. यामुळे गावगाड्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने राजकीय पक्षांनी सरपंच पदाच्या उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. त्यात भाजप आघाडीवर आहे . भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचे होमग्राउंड असलेल्या देवळा तालुक्यात एकूण १३ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने आहेर यांनी या ग्रामपंचायतीवर सरपंच पदाच्या उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचे समजते. यासाठी इच्छुकांनी व गाव पुढाऱ्यांनी आपल्या मर्जीतील उमेदवाराला सरपंच पदाची उमेदवारी मिळावी यासाठी गळ घातली जात आहे .
यासाठी भाजपच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी देखील संबंधित गावांत जाऊन सरपंच पदाच्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे .जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक सरपंच निवडून येण्यासाठी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी
कंबर कसले असून, सरपंच पदाची उमेदवारी कोणाला मिळते हे लवकरच स्पष्ट होणार असले तरी विरोधकांनी देखील याकामी तयारी दर्शवली आहे . माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दोन दिवसापूर्वी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन यात होउ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागा अशा सूचना केल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या पक्षीय पातळीवर जरी लढवल्या जात नसल्या तरी गावगाड्याच्या राजकारणात भाऊबंदकी सह , गट तटाचा सक्रिय सहभाग असल्याने त्याला राजकीय वर्चस्व प्रस्थापित होते.
यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे इच्छुकांनी प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला असून, उमेदवारी मिळविण्यासाठी गुप्त बैठकांना जोर आला असून .तूर्तास ग्रामपंचायत निवडणूमुळे तालुक्यातील तेरा गावात राजकिय घडामोडींना वेग आला आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम