देवळा : शुक्रवारी दि २८ रोजी साडे बारा वाजेच्या सुमारास उमराणे येथे अवैद्य गोवंश करणारे वाहन पकडण्यात आले आहे. देवळा पोलिसांत अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी दि २८रोजी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास उमराने येथे मुंबईआग्रा महामार्गावर अवैद्य रित्या गोवंशाची वाहतूक करणारे बेलोरो क्रमांक एम एच ०५/ बी एच २४१४ या वाहनातून एक बैल व सहा गाई असे सात जनावरे कत्तलीसाठी मालेगाव च्या दिशेने जात असतांना गोरक्षकांनी पकडून जवळपास तीन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल देवळा पोलिसांच्या स्वाधीन केला.
आरोपी फरार असून, देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुभाष चव्हाण आदी करीत आहेत. जनावरे व अवैद्य वाहतूक करणारे वाहन जमा करण्यात आले असून, जनावरांची गो शाळेत रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती गोरक्षकांनी दिली आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम