Gold Silver Rate Today | सोने-चांदी चमकले; असे आहेत आजचे दर

0
25
Gold Silver Price 1 June 2024
Gold Silver Price 1 June 2024

Gold Silver Rate Today |  या महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरांत घसरण सुरू होती. दरम्यान, आता तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत मोठी दरवाढ होताना दिसत आहे. ३ जानेवारी पासून सुरू असलेल्या या घसरणी दरम्यान सोन्याच्या किंमती तब्बल १३०० रुपयांनी तर, चांदीच्या किंमती तब्बल ३१०० रुपयांनी खाली आल्या आहेत. गेल्या वर्षी सोने तेजीत होते. त्यानंतर होत असलेल्या या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, हे दर अजून खाली येण्याची अपेक्षा होती. मात्र, आता सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशा आहेत सोने-चांदीचे आजचे दर…(Gold Silver Rate Today)

Gold Silver Rate Today | सोने झळाळले 

या वर्षात सोन्याने ग्राहकांना सुखावले होते. ३ जानेवारी ते ११ जानेवारीपर्यंत लगातार सोन्याचे दर खाली येत होते. घसरण झाली. त्यानंतर १२ जानेवारीपासून दरांमध्ये किरकोळ वाढ होताना दिसली. अनुक्रमे १२, १३ आणि १५ जानेवारी रोजी १००, ३००, १५० रुपयांनी दर वाढले होते. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ५८,३०० रुपये तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६३,५९० रुपये असे आहेत.

Gold Rate Today | आज तुमच्या शहरात असे आहेत सोने-चांदीचे दर

चांदीही महागली 

गेल्या वर्षात सोन्यासोबतच चांदीचीही नांदी सुरू होती. त्यानंतर या वर्षात चांदीही नरमली होती. तर, १० जानेवारी रोजी किंमती ६०० रुपयांनी खाली आल्या. ११ जानेवारी आणि १२ जानेवारी चांदीचे दर हे स्थिर होते. तर, १३ जानेवारी रोजी किंमतींमध्ये ५०० रुपयांनी तर, १५ जानेवारी ३०० रुपयांनी भर पडली. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज एक किलो चांदीचे दर हे ७६,८०० रुपये असे आहेत.(Gold Silver Rate Today)

असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज सोने आणि चांदीचे दर वादळे आहेत. तर, असे आहेत प्रति कॅरेटप्रमाणे सोन्याचे दर…

२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६२,७०७ रुपये,

२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६२,४५६ रुपये,

२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ५७,४३९ रुपये

१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ४७,०३० रुपये,

तर, १४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ३६,६८३ रुपयांवर पोहोचले आहेत.

दरम्यान, आज एक किलो चांदीचे दर हे ७२,१४० रुपये असे आहेत.(Gold Silver Rate Today)

Gold Rate Today | सोन्यात वाढ तर चांदी जैसे थे; असे आहेत सोने-चांदीचे दर

या शहरांत असे आहेत दर – 

पुणे – २४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६३,४४० रुपये

नाशिक – २४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६३,४४७ रुपये

नागपूर – २४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६३,४४० रुपये

कोल्हापूर – २४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६३,४४० रुपये असे आहेत.(Gold Silver Rate Today)

(टीप – वरील बाबी ‘द पॉइंट नाऊ’ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही. वरील दर हे सूचक असून, यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here