Gold Silver Rate | वर्षाअखेरीस असे आहेत सोने चांदीचे दर

0
13
Gold Silver Price 30 May 2024
Gold Silver Price 30 May 2024

Gold Silver Rate | नववर्षाच्या मुहूर्तावर सोने चांदीची खरेदी कर्णीसाठी इच्छुक ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. कारण वर्षाच्या अखेरीसही सोने चांदीच्या दारांनी मोठी उसळी घेतली आहे. हा किंमतींचा आलेख पुन्हा एकदा आगेकूच करताना दिसत आहे. दरम्यान, ह्या मौल्यवान धातूंच्या किंमतीत मोठी भर पडल्याने ग्राहक हिरमुसले आहेत.

ह्या वर्षाच्या शेवटच्या सत्रातही सोने-चांदीत गुंतवणूकीची काहींची संधी हिरावली असून, ज्यांनी पूर्वी गुंतवणूक केली आहे. त्यांना मात्र याकाळात चांगलंच फायदा झाला आहे. तसेच, ऐन लग्न सराईत ह्या किंमती वधारल्याने वधू पित्यांचे गणित कोलमडले आहे. गगनाला भिडलेल्या ह्या किंमती ऐकून काहींनी काढत पाय घेतला आहे. जाणून घ्या २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात कसे आहेत सोनर-चांदीचे दर..?

Deola | सामाजिक दायित्व पार पाडत, देवळ्यातील वधू वरांनी ठेवला आदर्श

Gold Silver Rate | असे वधारले सोन्याचे दर 

गेल्या दोन आठवड्यातच सोन्याच्या दरांनी २७०० रुपयांनी आगेकूच केली आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वीच भावात तब्बल ११०० रुपयांनी भर पडली आहे. तर मागील आठवड्यात किंमती पुन्हा ८८० रुपयांनी वाढल्या आहेत. दरम्यान, या आठवड्यात किंमतींनी तब्बल ७०० रुपयांनी वधारल्या आहेत. ह्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किंमती ह्या काही प्रमाणात स्थिर होत्या. तर गुडरिटर्न्सनुसार, आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ५९,०५० रुपये आहे तर, २४ कॅरेट सोन्याचे दर हे  ६४,४०० रुपये प्रति १० ग्रॅम असे आहे.

Somvar pooja | दर सोमवारी ‘हे’ उपाय केल्यास अनेक समस्या होतील दूर

चांदीच्या दरांत अशी वाढ 

गेल्या दोन आठवड्यात चांदीच्या किंमतीमध्ये तब्बल ६,१०० रुपयांची वाढ झाली आहे. ह्या आठवड्यात २५ डिसेंबर रोजी चांदीच्या दरांत २०० आणि २६ डिसेंबर रोजी ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. प्रत्येकी २७ आणि २८ डिसेंबर रोजी ३०० रुपयांची घसरण झाली आहे. तर गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचे दर हे ७९,५०० रुपये असा आहे.

असा आहे १४ ते २४ कॅरेटचे दर 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, २४ कॅरेट सोन्याचे दर हे ६३,४४५ रुपये तर, २३ कॅरेट ६३,१९८ रुपये असे आहेत. २२ कॅरेट सोने हे ५८,१२२ रुपयांवर पोहोचले आहेत. तर, १४ कॅरेट सोने हे ३७,११९ प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहेत. दरम्यान, एक किलो चांदीचा आजचा दर ७४,६३३ रुपये असा झाला आहे.

(वरील सोन्याचे दर हे सूचक असून, यात कुठल्याही करांचा समावेश नाही, अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here