Gold Silver Rate | सोने-चांदी हे अजून काही दिवसांत सर्वसामान्यांच्या अवाक्या बाहेर जाण्याची शक्यता आहे. मागील १०-१२ दिवसांचा सोने व चांदीचा दरवाढीचा वेग हा अचंबित करणारा आहे. आता ह्या मौल्यवान धातूंनी पुन्हा एकदा मोठी उसळी घेतली आहे. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, सोने आणि चांदीने सर्वकालीन विक्रमी उच्चांक गाठला आहे.(Gold Silver Rate)
मात्र, सोने-चांदीत होणारी ही दरवाढ थांबण्याची किंवा माघारी येण्याचे आता कोणतेच संकेत दिसत नाही. एका पाठोपाठ एक नवीन विक्रम हे दोन्ही मौल्यवान धातू आपापल्या नावावर कोरत आहेत. या आठवड्यात ४ मे २०२३ रोजीचा, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम ही सोन्याची किंमत ६१,६४६ रुपयांचा रेकॉर्ड आता मोडल आहे. तर, बुधवारी ह्या किंमती ६२,६२९ रुपयांवर पोहोचल्या होत्या. शुक्रवारी २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ६२,७२८ रुपये झाला आहे. तर चांदीचा दर हा ७६,४०० रुपये प्रति किलो असा आहे. (Gold Silver Rate)
सोन्याचा विक्रम
दिवाळीपासूनच दरवाढीचे सत्र हे सुरुच आहे. त्याला काल किंचित ब्रेक लागला होता. तर, या आठवड्यात सोन्याने आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड मोडलेत. पण, त्यासोबतच नवीन विक्रमही केले. या आठवड्यात सोमवार (दि.२७ नोव्हेंबर) रोजी सोने हे २५० रुपयांनी महागले आहे. तर, २८ नोव्हेंबर रोजीचा भाव अपडेट झालाच नाही.
२९ नोव्हेंबर रोजी हे दर ८२० रुपयांनी वधारले होते. ३० नोव्हेंबर रोजी ह्या दरांत ६५० रुपयांची घसरण झाली होती. तर, १ डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमतीमध्ये २२० रुपयांची दरवाढ झाली होती. गुडरिटर्न्सनुसार, आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ५७,८५० रुपये तर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६३,१०० रुपये असे आहेत.(Gold Silver Rate)
Sunita patil: माऊली पुन्हा सेवेत हजर होईल; पालकमंत्री भुसे यांनी व्यक्त केला विश्वास
चांदी महागली
मागील आठवड्यात १४०० रुपयांनी चांदीच्या किंमती वाढल्या होत्या. तर, ह्या आठवड्यात २३०० रुपयांनी चांदी ही महागली आहे. २७ नोव्हेंबर रोजी किंमती ह्या १००० रुपयांनी वाढल्या आहेत. तसेच २८ नोव्हेंबर रोजी ह्या किंमती अपडेट झाल्या नाहीत. २९ नोव्हेंबर रोजी चांदीच्या दरांत ७०० रुपयांनी वाढ झाली. तर, १ डिसेंबर रोजी ३०० रुपयांनी दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा दर हा ७९,५०० रुपये असा आहे.(Gold Silver Rate)
असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ६२,७२८ रुपये इतके आहेत. तर, २३ कॅरेट प्रति १० ग्रॅम ६२,४७७ रुपये असे आहेत. २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ५७,४५८ रुपये झाले आहे. तर, १८ कॅरेट प्रति १० ग्रॅम ४७,०४६ रुपये इतके आहे. १४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ३६,६९५ रुपयांवर पोहचले आहे. दरम्यान, एक किलो चांदीचा आजचा दर हा ७६,४०० रुपये झाला आहे. (Gold Silver Rate)
(वरील सोन्याचे दर हे सूचक आहेत तसेच त्यात जीएसटी, टीसीएस व इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.)
Breaking | चांदवडमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा केंद्रीय मंत्र्यांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम