फोटो गॅलरी : गोदावरी नदीला पूर; दुतोंड्या मारुती पाण्याखाली

0
44

नाशिक, प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून नाशकात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सकाळपासून शहरातील रामकुंड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच दुतोंड्या मारुतीही पाण्याखाली गेला आहे. (सर्व फोटोज् – क्षितिज लोखंडे)

गंगापूर धरणातून आतापर्यंत १०००० क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे.

वाढत्या विसर्गामुळे दशक्रिया घाट व अशी छोटी मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहे.

रात्रीपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने तिथल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

यावेळी गोदावरीच्या पुराचा मापक समजला जाणारा दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेला आहे.

पूर पाहण्यासाठी नाशिककरांनी यावेळी मोठी गर्दी केली, त्यामुळे होळकर पुलावर काहीकाळ ट्रॅफिक जाम झाला होता.

दरम्यान, पूर पाहण्यासाठी बघणाऱ्यांची एकच गर्दी झाल्याने पोलिसांना आपल्या बळाचा वापर करावा लागला.

पुराचे पाणी थेट रस्त्यापर्यंत आल्याने आसपासच्या व्यावसायिकांनी आपापली दुकाने सुरक्षितस्थळी हलविले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here