भल्या पहाटे पोलिस ॲक्शनमोडवर गावठी हातभट्टी उध्वस्त; घोटी पोलिसांची दमदार कामगिरी

0
39

राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : नाशिक जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडून काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील जनतेसाठी पोलीस प्रशासन तत्पर असून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी छुप्या पद्धतीने चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याकरिता पंधरा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

ग्रामीण भागातील नागरिक अवैध धंद्यांची तक्रार थेट माझ्याकडेही करू शकतात यासाठी लवकरच स्वतंत्र अशी एक हेल्पलाईन देखील कार्यालयाकडून जाहीर करण्यात येणार असल्याचेही उमाप यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी आपल्या अधिकाऱ्यांसमवेत घोटी ग्रामीण कार्यक्षेत्रात प्रभावी व पारदर्शक पोलिसिंग सत्र चालू केले असून बुधवार ता.१६ दरम्यान पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास इगतपुरीच्या पूर्व भागातील बोरीचीवाडी येथे जंगलात असलेल्या ठिकाणी छापा टाकत घटनास्थळी असलेले गावठी दारूची हात भट्टी व गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन उध्वस्त केले आहे.यात अवैध रित्या गावठी हातभट्टी चालविणारे आरोपी शिवराम चंदर मेंगाळ, भाऊसाहेब काळू मेंगाळ राहणार बोरीचीवाडी यांना घटनास्थळी ताब्यात घेतले आहे.दरम्यान ग्रामीण भागात कर्तव्यदक्ष राहून कडक कारवाई करत पारदर्शक काम करणारे दबंग अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांची सर्वत्र ओळख आहे अशीच काहीशी ओळख आज खेडकर यांनी पहाटेच्या सुमारास केलेल्या कडक करवाईतुन दिसून आली आहे या कडक कारवाईने ग्रामीण भागातील अवैध रित्या चालणारे दारूचे गुत्ते, हातभट्टी,धंदे व्यवसायिकांना चांगलाच चाप दिला आहे.

दरम्यान मंगळवार ता.१६ पहाटे साडे सहा वाजेच्या सुमारास बोरीची वाडी येथील जंगलात असलेल्या ठिकाणी स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेड यांनी आपला पोलीस ताफा नेत अवैध रित्या चालू असलेला गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त केली व सदर हातभट्टी साठी वापरण्यात येणारे रसायन याची देखील घटनास्थळी विल्हेवाट लावली.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर,सहाय्यक पोलीस उप निरीक्षक बी पी राऊत,शिवाजी जुंद्रे,पोलीस कॉन्स्टेबल केशव बसते,संदीप दुमळे, योगेश यंदे आदी उपस्थित होते.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here