गणेशतोत्सवाच्या निमित्ताने घोडेवाडीत स्वच्छतेचा श्री गणेशा

0
21

राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद बु हद्दीतील घोडेवाडीमध्ये स्वदेश फाउंडेशनच्या सौजन्याने व ग्रामपंचायतच्या प्रयत्नातून ऐन गणेशोत्सवात स्थानिक ग्रामस्थांना एकत्र घेत सकाळी गणेशाची आरती घेऊन गाव स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली.

या स्वच्छता मोहिमेत स्वदेश फाउंडेशन सह टाकेद ग्रामपंचायत पदाधिकारी व घोडेवाडीतील सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. सर्वांच्या मदतीने संपूर्ण गाव स्वच्छ झाल्यानंतर ग्रामस्थ शेतकऱ्यांची विविध शासकीय कार्ड काढण्यासाठी शिबीर घेण्यात आले. या शिबिराला देखील गावातील ग्रामस्थांची उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविला.

यावेळी स्वदेश फाउंडेशनचे तालुका समन्वयक योगेश तोतरे, तुळशिराम खंडागळे, विकास वारघडे , निलेश चव्हाण सर तलाठी सचिन कराते,कृषी सहाय्यक जयश्री गांगुर्डे,अशोक राऊत उपस्थित होते.यानंतर दुपारच्या दरम्यान कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तलाठी आदींच्या उपस्थितीत पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्षात पाहणी करून पंचनामे शिवार फेरी करण्यात आली. व त्यानंतर शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

यावेळी गाव विकास समिती, उपजिविका समिती, निगराणी समिती व घोडेवाडी येथील सर्व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान सरपंच सौ.ताराबाई रतन बांबळे उपसरपंच रामचंद्र परदेशी , सदस्य व सामाजिक कार्यकर्ते रतन नाना बांबळे यांनी भेट दिली.शिबिरा दरम्यान ऑपरेटर म्हणून टाकेद बु ग्रा प चे सागर दवंडे व बॅक ऑफ बडोदा चे सोमनाथ पेठेकर यांनी काम पाहिले.

या सर्व कार्यक्रमाचे आयोजक भक्तराज जटायु गाव विकास समिती घोडे वाडीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन आदर्श शेतकरी पुरस्कार विजेते प्रगतिशील शेतकरी जगन तुकाराम घोडे हे होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत टाकेद बु सरपंच सौ ताराबाई रतन बांबळे,उपसरपंच रामचंद्र परदेशी,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here