गंगापूर धरणातून इतक्या क्युसेस पाण्याचा विसर्ग ! स्थानिकांना सतर्कतेचा इशारा

0
18
gangapur

नाशिक – गंगापूर धरणक्षेत्र व पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार चालू असून अजूनही पावसाचा जोर असल्याने गंगापूर धरणांतून आतापर्यंत ५००० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

ताज्या माहितीनुसार, जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून गंगापूर धरणक्षेत्रातही चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे आज गंगापूर धरणांतून आतापर्यंत जवळपास ८००० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

यावेळी जिल्हा प्रशासनाने सांगितले की, धरणक्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे दुपारी १२ वाजता गंगापूर धरणातून सुमारे ३००० क्युसेस पाणी तर दुपारी १ वाजेपर्यंत ५००० क्युसेस असे सुमारे ८००० क्युसेस इतके पाणी आतापर्यंत गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तसेच पावसाचा जोर असाच राहिल्यास हा विसर्ग टप्याटप्याने वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, ह्या वाढत्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना व तिथल्या स्थानिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here