शहरात पहिल्यांदाच सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणूकीला सुरुवात होणार

0
11

नाशिक – शहरात यंदा पहिल्यांदाच मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक सकाळपासून सुरु करण्याचा निर्णय शहर पोलीस व गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. या निर्णयामुळे यंदा सकाळपासूनच मिरवणुकीचा आनंद नाशिककरांना घेता येणार आहे.

सर्व गणेशोत्सव मंडळांना मिरवणुकीवेळी पांरपरिक मिरवणूक मार्गावरून वेळेत बाप्पांचे विसर्जन करता यावे, यासाठी पाेलिस आणि गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या भद्रकाली पाेलिस ठाणे येथील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी बैठकीत सकाळपासून मिरवणूक होणार असल्याने प्रत्येक मंडळाला शहरातील मुख्य चाैकांमध्ये २० मिनिटे थांबण्याची वेळही निश्चित करण्यात आली आहे. जे या नियमाचे पालन करणार नाही अश्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे.

वाकडी बारव येथून प्रारंभ हाेणाऱ्या मिरवणुकीसाठी २०१९ प्रमाणेच गणेश मंडळांना क्रमांक देण्यात येण्यावर चर्चा सुरू हाेताच काही मंडळानी  आक्षेप घेतला. पुढे असलेले चित्ररथ वेळ पाळत नाही, परिणामी शेवटच्या मंडळांना एमजीराेडवर येण्यास रात्रीचे १२ वाजतात. त्यामुळे मानाचे गणपती वगळता चिठ्ठी पद्धतीने इतर मंडळांचे नंबर काढावे, अशी मागणी केल्याने एकच वाद रंगला. अखेर सकाळी ११ वाजता मिरवणुक सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला व सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी याचे स्वागत केले. यावेळी गजानन शेलार, विनायक पांडे, प्रथमेश गिते, दिनेश कमाेद, गणेश माेरे, गणेश बर्वे आदींसह गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here