Nashik news | शिवसेना (उबाठा) गटाचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या भरवस्तीतील आणि वर्दळ असणाऱ्या कार्यालयात आज सकाळी चक्क बिबट्याने हजेरी लावली होती. सुदैवाने या वेळी कार्यालयात कोणीही नव्हते. शहरात विविध भागात तब्बल चार बिबटे असल्याचे सांगितले जात आहे.
नाशिक शहरातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या सिडको या भागातील शिवसेना (उबाठा) गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालय परिसरात आज बिबट्याचा मुक्तवावर होता. त्यामुळे परिसरात सकाळी दहशतीचे वातावरण होते. दरम्यान, या वेळी बडगुजर हेदेखील आसाम येथे गेले होते.
आज पहाटे शिवसेना (उबाठा) नाशिक महानगरप्रमुख बडगुजर यांच्या संपर्क कार्यालया जवळ व नंतर परिसरात बिबट्याचा वावर दिसला. या भागातील विविध सीसीटीव्हीमध्ये हा बिबट्या बहुदा भक्ष्याच्या शोधात फिरत असल्याचे दिसले. पण, दाट लोकवस्तीच्या परिसरातून त्याला बहुदा बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसावा. त्यामुळे तो भरकटल्याचे दिसत होते.
नाशिक | शहरात हिऱ्यांच्या बाजारपेठेला वाढता प्रतिसाद; कोणत्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी?
काही वेळातच ही बातमी आणि बिबट्यादेखील परिसरातील विविध गल्ल्यांमध्ये दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. नागरिकांनी वन विभाग आणि पोलिसांना कळवले. त्यामुळे ही पथके तातडीने दाखल झाली. पण, नागरिकांचा प्रचंड गोंगाट आणि सेफ पॅसेज मिळत नसल्याने गोंधळलेला बिबट्याचा खेळ बराच काळ सुरू होता. त्यामुळे आजची सकाळ ही सिडकोवासीयांसाठी चांगलीच घबराटीची गेली.
आसाम येथे असलेल्या सुधाकर बडगुजर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. त्यानंतर पथकाने याठिकाणी आपले काम केले. या पथकाने बिबट्याला ट्रॅक्युलायझन गनद्वारे भुलीचे इंजेक्शन मारले व बिबट्याला सावता नगर येथे पळत असताना बेशुद्ध केले. त्यानंतर या बिबट्याला पकडून नेले. त्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
दरम्यान, नाशिक शहरातील मुंबई नाका भागातदेखील एक बिबटया आढळला आहे. त्याला पकडण्याची कार्यवाही सुरू असतानाच सिडको भागातही अन्य बिबटे आढळले. त्यामुळे या भागात एक नव्हे तर तब्बल चार बिबटे असल्याची चर्चा पसरल्याने नागरिकांमध्ये प्राचंड घबराट पसरली आहे.
Viral News | तरुणांचा प्रताप; स्कॉर्पिओचा सुसाट वेग अन् टपावर फटाक्यांची आतिषबाजी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम