Nashik news | नाशिकचे प्रसिद्ध सराफ दंडे यांच्या फ्रॉड स्कीम उघड..?

0
55

Nashik news | नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कारडा यांच्या विरोधात फसवणुकीचे अनेक गुन्हा दाखल झाल्यानंतर आता नाशिकचे प्रसिद्ध सराफ व्यापारी मिलिंद दंडे यांनीही फसवणूक केल्याचा प्रकार समोर अला आहे.

आता त्यांच्या विरोधातही उपनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४४० ग्रॅम सोन्याचा अपहार केल्या प्रकरणी, सराफ मिलिंद दंडे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. मिलिंद दंडे हे नाशिकच्या सराफ क्षेत्रातील एक मोठे नाव आहे, तसेच नाशिकरोड परिसरातील प्रसिद्ध सराफ आहेत. खात्रीशीर सोने खरेदीसाठी ग्राहक विश्वासाने त्यांच्याकडे जातात.

Crime News | अल्पवयीन मुलावर मशिदीच्या करमचाऱ्याने केला लैंगिक अत्याचार

२०१९ मध्ये दंडे यांनी ग्राहकांसाठी एक स्कीम काढली होती. ग्राहकांकडून सोने घेऊन त्यावर वर्षाला ११% व्याज हे या स्कीम नुसार दिले जाणार होते.

विवेकानंद शिवराम उमरानी ( रा. पाईपलाईन रोड, आनंदवल्ली) यांनी या स्कीम मध्ये ४४० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची गुंतवणूक केली होती.

४ वर्ष झाले तरीही त्यांना ना व्याज मिळाले, ना दागिने. वारंवार मागणी करूनही दागिने परत मिळत नसल्याने, त्यांनी उपनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन दांडे यांच्या विरोधात दगिन्यांचा अपहार केल्याचा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भामरे हे करीत आहेत.

sbi recruitment | SBI मध्ये ८,२८३ पदांसाठी बंपर भरती


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here