नाशिकच्या देवयानी फरांदेसह चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक…

0
20

पुणे – आई आजारी असल्याचे कारण देत एका तरुणाने चार महिला आमदारांकडून पैसे उकळले. अखेर या तरुणांविरोधात एका आमदाराने तक्रार नोंदवली, त्याआधारे पुण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार महिला आमदारांची फसवणूक करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आईच्या मेडिकल आणि हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी हा तरुण आमदारांकडे मदतीची याचना करत होता. आमदारांनीही तरुणावर विश्वास ठेवत त्याला काही पैशांची मदत केली. पुण्याच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अखेर तरुणाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पुणे पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास केला जातोय.

तक्रारीत आमदार माधुरी मिसाळ यांच्यासोबत नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे, मेघना बोर्डीकर आणि श्वेता महाले यांचीदेखील आर्थिक फसवणूक केल्याचे नमूद केले आहे. माझी आई आजारी आहे, असे म्हणत संबंधित तरुणाने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. सामाजिक बांधिकली जपत आमदारांनीही त्या तरुणाला मदत केली. पण आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आपली तक्रार पोलिसात दाखल केली.

मुकेश राठोड असे ह्या तरुणाचे नाव आहे. त्याने गूगल पेच्या माध्यमातून ही फसवणूक केली आहे. त्याने मिसाळ यांच्याकडून ४,३०० रुपये घेतले व बाकीच्या आमदारांकडूनही अश्याच प्रकारे त्याने पैसे उकळले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here