NMC Election | आधी लोकसभा; त्यानंतरच होणार महापालिका निवडणुका

0
13
नाशिक महापालिका

NMC Election | केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. त्याअनुषंगाने निवडणुकीसाठी लागणारे मनुष्यबळाची जुळवाजुळव सुरू झालेली असून महापालिकेकडून कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आलेली आहे. यामुळे आता डिसेंबरअखेर येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणूका ह्या लोकसभेच्या निवडणुकीनंतरच होतील, असे जवळपास स्पष्ट झालेले आहे. याबाबत नाशिक महापालिकेलादेखील पत्रही प्राप्त झालेले आहे. त्यामुळे आधी लोकसभेच्या निवडणुका आणि त्यानंतरच महापालिकेच्या निवडणुका असं धोरण स्पष्ट असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच महापालिकेच्या निवडणुका होतील हे आता जवळजवळ स्पष्ट झालेले आहे.

पाकिस्तानला भिती भरेल; बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार-मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

लोकसभेनंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका असल्याने दोन्ही निवडणुका एकाच वेळेस घेण्याचे नियोजनही सुरू आहे. परंतु सरकारविरोधी लहरीपणाचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या निवडणुका आणखी लांबण्याची दाट शक्यता आता व्यक्त केली जात आहे. नाशिक महापालिकेसह राज्यातील 18 महापालिकेची मुदत 15 मार्च 2022 ला संपुष्टात आली आहे. त्यानंतर निवडणुका होणे अपेक्षित होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निवडणुकांची तयारीदेखील केली आहे. प्रभागरचना आणि मतदारयादी तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयाचा दावा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रभागरचनेवरून देखील न्यायालयात दावा दाखल झाल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया न्यायालयाच्या चौकटीत अडकली आहे.

 

दरम्यान, निवडणुका होत नसल्याने असंतोष मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसुन येत आहे तरी या पार्श्वभूमीवर डिसेंबरअखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असे बोललं जात होते. मात्र निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिकांना पत्र पाठवून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. त्या पत्रामध्ये मनुष्यबळाची जुळवाजुळव करण्यासाठी स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. नाशिक महापालिकेलाही या संदर्भात पत्र प्राप्त झालेले आहे. त्यामुळे आधी लोकसभेच्या निवडणुका आणि त्यानंतरच महापालिकेच्या निवडणुका, असे धोरण स्पष्ट असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच महापालिकेच्या निवडणुका होतील हे आता जवळजवळ स्पष्ट झालेले आहे.

Maharashtra News | शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांवर थेट कारवाई करा; अब्दुल सत्तारांचे आदेश

केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिक महानगरपालिका 21 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पत्र पाठविलेले आहे. त्यात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी तसेच अन्य निवडणुकीसंदर्भात लागणारी माहिती मागवलेली आहे. मतदान केंद्रनिहाय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मनुष्यबळाची जमवाजमव यातून केली जाते आहे. दरम्यान, 1 जुलै 2023 कट ऑफ डेट निश्चित करण्यात आलेली होती. परंतु या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारच्या निवडणुका न झाल्याने पुन्हा नव्याने निवडणुका घेण्यासाठी कट ऑफ डेट निश्चित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here