साधूग्राम करिता पुन्हा नव्या जागेचा शोध….

0
13

द पॉईंट नाऊ: नाशिकमध्ये येत्या २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यास अजून अवधी असला तरी त्याच्या तयारी अगोदरच सुरुवात करावी लागते. नाशिकचा कुंभमेळा हा शहरालगत भरत असल्याने यासाठी साधुग्रामच्या जागा महत्त्वाची आहे. साधुग्रामची जागा प्रत्येक कुंभमेळ्यात बदल असल्याचे चित्र दिसते. तपोवनच्या प्रवेशद्वाराजवळील महापालिकेची साधुग्रामची आरक्षित जागेपैकी सुमारे दहा एकरवर सिटीलिंक बससेवेच्या डेपो तयार करण्यात आला आहे. त्यामुळे याला साधुग्राम करण्यास अनेक साधु महंताचा विरोध होता. मात्र, जागाच नसल्याने हा पर्याय निवडला गेला. या भागातील शेतकऱ्यांचे आंबा, पेरू, ऊस, द्राक्ष असे मळे या साधुग्रामासाठी तोडण्यात येऊन त्या जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या होत्या.

कुंभमेळ्याचा समारोप झाल्यानंतर या जागा रिकाम्या झाल्या त्यातील बहुतांशी जागांवर विविध प्रकारचे व्यवसाय थाटले गेले आहे. त्यामुळे . साधुग्रामची ही जागा वापरात येऊ लागली आहे. औरंगाबाद रोडकडून तसेच कैलासनगर सिग्नलपासून टाकळी रोडने साधुग्रामकडे येणाऱ्यासाठी मोकळी जागा होती. या सर्वच जागांवर व्यवसाय थाटले आहे. गेल्या काही कुंभमेळ्यांचा अनुभव लक्षात घेता ज्या जागा वापरात आहेत. त्या सोडून मोकळ्या जागेत साधुग्राम होत असल्याने जेथे व्यवसाय सुरू आहेत, त्यांच्या पर्यायी जागेसाठी नव्या मोकळ्या जागेची गरज भासणार आहे. ती जागा आता टाकळी मार्गाच्या असल्याने त्या जागेचा किंवा मलजलशुद्धीकरण केंद्राच्या पूर्वेला गोदाकाठच्या भागाचा विचार होऊ शकतो.

नदीच्या पलीकडेही साधुग्रामासाठी जागा होती, त्या जागाही आता मोकळ्या राहिल्या नाहीत.कपिला संगमाच्या पलीकडे तंबूंनाही जागा द्यावी लागणार आहे.महापालिकेकडून ७० पैकी दहा एकरवर सिटीलिंक बस डेपोची उभारणी केली आहे.गेल्या कुंभमेळ्याच्या रस्त्याकडील बहुतांशी भागात व्यवसाय सुरू परिणामी मोकळ्या जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.या संदर्भात टाकळी मार्गाच्या पूर्वेला असलेल्या जागेचा विचार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here