Corruption :- नाशिक जिल्ह्यात विविध शासकीय खात्यांमध्ये लाचखोर कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकण्याचे प्रकार सुरूच असून, सोमवारी सिन्नर येथील भूमिअभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक प्रतिभा दत्तात्रय करंजे या महिला कर्मचारी पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात सापडल्या. दरम्यान या सापळ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचण्याचे शतक पूर्ण केले आहे.
याबाबत माहिती अशी, की तक्रारदाराने मनेगाव (ता. सिन्नर) येथे एक प्लॉट खरेदी केला होता. त्या प्लॉटच्या सिटी सर्व्हे नंबरच्या रेकॉर्डवर जुन्या मालकाचे नाव कमी करून तक्रारदार यांच्या पत्नीचे नाव नोंदवायचे होते. या कामासाठी सिन्नरच्या भूमि अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक प्रतिभा दत्तात्रय करंजे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधताच पडताळणी करून सापळा लावण्यात आला. भूमिअभिलेख खात्याच्या कार्यालयातच लावण्यात आलेल्या या सापळ्यात प्रतिभा करंजे या सोमवार दि. 10 जुलै रोजी अडकल्या. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा नोंदविण्याची पुढील कारवाई सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम