FDA Raid : नाशिकमध्ये भेसळयुक्त पदार्थ विक्रेत्यांचा सुळसुळाट ; सलग तिसऱ्या दिवशी धाडसत्र

0
22

FDA raid : अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात सुटे खाद्यतेल, लेबल दोषयुक्त औषधसाठा व परराज्यातील स्वीट मावा जप्त करण्या आला आहे. सलग तिसऱ्या दिवशी राबविण्यात आलेल्या या धाडसत्रामुळे अवैध पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. तर रोजच होत असलेल्या या कारवाईमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीच वातावरण पसरल आहे.(FDA raid)

गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनातर्फे धाडसत्र सुरू करण्यात आला आहे. नाशिक शहरासह जिल्हाभरातील विविध ठिकाणी अचानकपणे धाड टाकून नागरिकांच्या जीविताशी होत असलेला खेळ थांबवण्याची मोहीम सध्या हाती घेण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये भेसळ युक्त स्वीट मावा, अवैध औषधे आणि खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे .(FDA raid)

https://thepointnow.in/dhule-strike/

अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री बाबत कठोर धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मे.प्रसाद प्रोव्हिजन, सुभाष पेठ, कळवण,नाशिक येथे  छापा टाकला असता त्याठिकाणी  खुल्या स्वरूपात 1 टन क्षमेतच्या टाकीतून नळाद्वारे  खुल्या खाद्यतेलाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले.  यावेळी 57 हजार 540 रूपयांचे 548 किलो खाद्यतेलाचा साठा जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात घेण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करीत असल्याने व्यवसाय बंदबाबत विक्रेत्यास नोटीस देण्यात आली आहे.सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी केली आहे.(FDA raid)

त्याचप्रमाणे मे.सैफी मेडिकल एजन्सीज,मामलेदार लेन, सोमवार वार्ड, मालेगाव या ठिकाणी  विक्रीसाठी ठेवलेला न्यूट्राक्युटिकल या औषधां(FDA raid) Neautracuitical (Nutriown) चा साठा लेबल दोषयुक्त आढळला आहे. याठिकानाहून 24 हजार 940 रूपये किंमतीच्या 175 बॉटल्सचा साठा जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात दिला असून सदर प्रकरणी उत्पादकापर्यंत तपास करण्यात येत आहे. सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी केली आहे.(FDA raid)

शहरातील बरेच मिठाई विक्रेते हे परराज्यातून येणाऱ्या  स्पेशल बर्फीचा वापर पेढा, बर्फी , मिठाई व तत्सम पदार्थ बनविण्यासाठी वापरत असल्याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांच्या पथकाने विर ट्रव्हल्स आणि पार्सल सर्व्हिसेस, व्दारका, नाशिक येथे पाळत ठेवत तेथे आलेल्या एका खाजगी बसमधून मे. यशराज डेअरी ॲण्ड स्वीटस, उपनगर,नाशिक व श्री. शांतराम बिन्नर आडवाडी, ता.सिन्नर यांनी गुजरात मधून डिलिशिअस स्वीटस व हलवा हे अन्नपदार्थ मागविले असल्याचे निदर्शनास आले. संबंधित विक्रेत्यांकडून वरील अन्नपदार्थांचे नमुने घेवून उर्वरित 130 किलो वजनाचा 22 हजार 300 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई  अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन व प्रमोद पाटील यांनी केली आहे.(FDA raid)

अन्न व औषध प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आवाहन
कोणीही खुल्या स्वरूपात खाद्यतेलाची फेरविक्री करू नये, परराज्यातील मावा वापरून मिठाई बनवून विक्री करू नये, औषधे विक्रेत्यांनी कायद्याच्या तरतुदीचे पालन करून व्यवसाय करावा तसेच खाजगी प्रवासी बसद्वारे व्यावसायिक दृष्टीने समान अथवा अन्न पदार्थ यांची वाहतुक करू नये अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहेत.

या तीनही ठिकाणाच्या कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) संजय नारागुडे व सह आयुक्त (अन्न) मनिष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आली आहे.(FDA raid)

गेल्या तीन दिवसांमध्ये ठीक ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाई भेसळयुक्त पनीर, विनापरवाना सुरू असलेला फरसाणचा कारखाना आणि काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईत शहरातील नामांकित हॉटेल्स मध्ये अस्वच्छता आणि भेसळयुक्त पदार्थ वापरण्यात येत असल्यामुळे कारवाई करण्यात आली होती. या कारवायांमुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात किती मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री केले जातात हे समोर येत असल्याने सर्वसामान्यांमध्ये बाहेरचे अन्न खावे की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे.(FDA raid)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here