बापरे ! प्रियकरासोबत राहण्यासाठी चक्क नवऱ्याचे ‘प्रायव्हेटपार्ट’ कापले

0
20

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : बंगळुरुमध्ये स्वतः बायकोने आपल्या नवऱ्याची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी बायकोने आपल्याच पतीची हत्या केली आहे. ही क्रूर महिला एवढं करून थांबली नाही तर तिने हत्या तर केली पण आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्टही कापला आणि एवढं करून या हत्येचा आरोप तिने तिचा पाठलाग करणाऱ्या एका व्यक्तीवर टाकला. बंगळुरुच्या येलाहंका भागामध्ये एका २१ वर्षीय महिलेला आणि तिच्या प्रियकराला तिच्या नवऱ्याची हत्या करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलं आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या पत्नीचं नाव श्वेता असून तिच्या प्रियकराचे नाव सुरेश असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती चंद्रशेखर  हा विणकराचा व्यवसाय करत असून २१ ऑक्टोबर रोजी येलहंका येथील कोंडाप्पा ले-आऊटमधील इमारतीच्या छतावर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीस मृताची बायको श्वेता हिने या हत्येचा आरोप लोकेश नावाच्या व्यक्तीवर केला होता. लोकेश हा तिचा पाठलाग करायचा, असा देखील आरोप त्या महिलेने केला आहे. डिसेंबरमध्ये श्वेताने लोकेशविरुद्ध पोलिसांत तक्रारही केली होती.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे ते म्हणाले की, श्वेताने आपल्या नवऱ्याच्या हत्येमागे लोकेश असल्याचे सांगितले असले तरी आम्हाला तिच्या सांगण्यावर मुळीच विश्वास नाहीये. कारण, तिच्या सांगण्यामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी आढळून आल्या आणि ती तपास करतेवेळी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय देखील त्यांनी आहे. संशयावरून पोलिसांनी तिचा मोबाईल तपासला असता नवऱ्याच्या हत्येत तिचाच सहभाग असल्याचे सिद्ध झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता सुरेशसोबत प्रेमसंबंधात होती, पण ६ महिन्यांपूर्वी चंद्रशेखरसोबत जबरदस्तीने लग्न झालं असल्याचे तपासात समोर आले आहे. चंद्रशेखर आणि श्वेता लग्नानंतर लगेचच बंगळुरुला राहायला गेले, पण श्वेताचे सुरेशसोबतचं नातं हे कायम राहिलं. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, श्वेता आणि सुरेश हे दोघं चंद्रशेखरच्या अनुपस्थितीत त्याच्या घरी भेटायचे. ऑगस्टमध्ये चंद्रशेखरला त्यांच्या नात्याबद्दल समजल्याने त्याने श्वेताला सुरेशला न भेटण्याची ताकीद दिली.

त्यानंतरच त्या दोघांनी चंद्रशेखरला मारण्याचा कट रचला. श्वेताला चंद्रशेखरच्या हत्येसाठी तिचा पाठलाग करणाऱ्या लोकेशला दोषी ठरवायचे होते, परंतु तिच्या कॉल रेकॉर्डवरून तिचे सुरेशसोबतचे प्रेमसंबंध उघड झाले आणि तिने तिच्या नवऱ्याच्या हत्येची कट आखलं असल्याचे उघड झाले. सध्या पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here