Crime : पुणे शहरात काळजाचा ठोका चुकवणारी एक भयानक घटना घडली आहे. जुळ्या मुलींना झोपेत बाहेरचे दूध पाजवल्याने त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार हडपसर पोलिसांनी वडील आणि आजोबा यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून या दोन्ही घटना वेगवेगळ्या दिवशी घडल्या आहेत.
आधुनिकतेच्या बाबतीत समाज कितीही पुढारला असला तरी मात्र अपत्य मुलगी झाली तर महिलेचा छळ केला जात असल्याचे अनेकदा अधोरेखित झाले आहेत. जुळे अपत्य दोनही मुलीच झाल्या याच रागातून दोन जुळ्या मुलींचा आजोबा आणि वडिलांनी एकप्रकारे बळी दिला असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी श्रीकृष्णा लोभे (वय ३५, रा. वाघोली) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मुलींचे वडील अतुल सूर्यवंशी आणि आजोबा बाबासाहेब सूर्यवंशी (वय ६२, सर्व रा. फुरसुंगी) यांच्यासह चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकार २६ नोव्हेंबर २०१९ आणि ६ फेब्रुवारी २०२० रोजी या घटना घडल्या आहेत. दरम्यान फिर्यादी यांची बहिण ऊर्मिला यांना मुलगाच पाहिजे, या कारणामुळे त्यांचा सासरी मानसिक छळ केला जायचा. होणारे बाळ गोर व्हाव यासाठी त्यांना गोळ्या देखील खाण्यास भाग पाडले गेले होते. त्यानंतरही त्यांना जुळ्या मुली झाल्या. त्यामुळे घरच्या मंडळीना राग अनावर झाला होता.
जुळ्या मुली झाल्यामुळे तिला सासरच्या मंडळी बद्दल भीती वाटत होती. बाळंतपणानंतर सहा महिन्यांनी त्या जुळ्या मुलींसह सासरी परतल्या. परंतु आरोपींनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सात महिन्यांची मुलगी सिद्धी ही झोपेत असताना तिला बाहेरील दूध पाजले. ते दूध श्वासनलिकेत गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ६ फेब्रुवारी २०२० रोजी नऊ महिन्यांची दुसरी मुलगी रिद्धी हिचाही त्याच पद्धतीने खून केला.
https://thepointnow.in/banners-around-varsha-bonglow/
दरम्यान याबाबत फिर्यादीने पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र, पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार हडपसर पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही घटनांमध्ये साम्य असून या प्रकरणामुळे पोलीसही चक्रावले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम