Fatal accident of car container : कार कंटेनरचा भीषण अपघात ; चार जण जागीच ठार, वाहनांचा चुराडा

0
49

Fatal accident of car container : तमिळनाडूमध्ये असलेल्या मदुराई जिल्ह्यातील थिरुमंगलम जवळ एका कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय. हा अपघात नेमका कसा घडला याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या मदुराई येथील मस्तानपट्टी टोल प्लाझाजवळ कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक चालकाच वाहनावरील नियंत्रण सुटल. यामुळे वेगाने असणाऱ्या या कंटेनर टोलवरील कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेत सतीश कुमार नावाच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. यानंतर हा पुढे जाऊन कंटेनर एका कारवर पलटी झाल्यामुळे कार मधील तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगीतले जात आहे.

दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, कारसह कंटेनरचा देखील यात चक्काचूर झाला आहे. तसेच अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. व बचाव कार्याला सुरवात केली.

https://thepointnow.in/sambhaji-bhide-grumbled-again/

दरम्यान मृत व्यक्तींची ओळख पटवली जात असल्याची माहिती मदुराई जिल्हा पोलिस अधीक्षक (एसपी) शिव प्रसाद यांनी दिली असून या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दुसऱ्या घटनेत 

येवला-कोपरगाव रोडवर तहसील कार्यालयाजवळ ट्रकच्या धडकेमध्ये होमगार्डचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रवीण कृष्णा भावसार असे मृत झालेल्या होमगार्डचे नाव असून ट्रकने धडक दिल्याने होमगार्ड प्रवीण गंभीर जखमी झाले होते. त्यांना त्वरित नाशिक येथे रुग्णालयात नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे.

या अपघाताबाबत येवला शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत. होमगार्ड प्रवीण कृष्णा भावसार यांचा अपघातात मृत्यू झाल्याने शहर परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

येवला – कोपरगाव रोडवर सतत रहदारी असते. या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आता केली जात आहे. शहरातून जाणारा हा रस्ता असल्यामुळे वाहनांची गर्दी येथे असते. ब-याच वेळा वाहतूक कोंडीच्या समस्येलाही वाहनधारकांना तोंड द्यावे लागले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here