Skip to content

Sambhaji Bhide grumbled again : महात्मा फुलें, राजा राममोहन रॉय यांना शिव्या ; साई बाबांना म्हणाले भ*** संभाजी भिडे पुन्हा बरळले


Sambhaji Bhide grumbled again : नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता संभाजी भिडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले, श्री साईबाबा व राजा राम मोहन रॉय यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन विधान केले आहेत. यामुळे संभाजी भिडे(sambhaji bhide) यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

https://thepointnow.in/fight-between-the-two-people-at-the-nashik-pahine-waterfall/

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधात गरळ ओकली होती. यामुळे संपूर्ण राज्यासह देशभरातून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात होती. तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी देशभरात आंदोलनही केले गेले. काँग्रेसच्या नेत्यांकडून संभाजी भिडें विरोधात जोरदार टीका देखील केल्या गेल्या. मात्र वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असतानाही संभाजी भिडे यांनी शांत न बसल्याचा निर्धार केला असल्याचं दिसून येत आहे.

संभाजी भिडे यांची वादग्रस्त विधान ची मालिका अद्यापही सुरूच आहे. अमरावती येथे आयोजित केलेल्या व्याख्याना(speech) प्रसंगी संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, शिर्डीचे श्री साईबाबा(saibaba) व राजा राममोहन रॉय यांच्या बद्दल आक्षेपार्ह व अतिशय खालील पातळीचं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची क्लिप सध्या व्हायरल झाली असून त्यांच्या विरोधात सुरू असलेली आंदोलन आणखी तीव्र झाली आहेत.

संभाजी भिडे यांनी आपल्या भाषणामध्ये महात्मा फुले, राजा राममोहन रॉय व साईबाबा यांच्या बाबत वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणामध्ये अर्वाच्य भाषेचा देखील उल्लेख केला आहे. त्यांच्या तीन तासांच्या या भाषणांमध्ये शेकडो शिव्या आणि जातीय तेढ निर्माण करणारी विधान असल्याचं समोर आल आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंसारख्या(mahatma fule) समाजसुधारकाला आणि लाखोंची श्रद्धा असलेला श्री साईबाबां बद्दल अमानकारक शब्द वापरल्यामुळे सर्वसामान्यांकडून देखील त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.

महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातील (maharashtra) महिला शिक्षणाचे प्रणेते व थोर समाज सुधारक म्हणून ओळखले जातात त्यांच कार्य हे सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे तेजस्वी असल्याने त्यांना क्रांतीसुर्य ही उपाधी देण्यात आली आहे. मात्र याच महात्मा फुलेंबाबत अतिशय अश्लाघ्य भाषेमध्ये संभाजी भिडे यांनी वक्तव्य केल आहे. देशात इंग्रजांनी ज्या **** समाजसुधारकांच्या पदव्या बहाल केल्या, फुलेही त्या समाजसुधारक नावाच्या भ*** यादीतले असल्याचे वक्तव्य संभाजी भिडे यांनी अमरावती येथे केलं.

इंग्रजांनी (british) निवडक लोकांना सुपर समाजसुधारकांच्या पदव्या देऊन तुमचेच वैरी तुमच्यावर सोडले. त्यात उत्तर प्रदेश मधील भारत प्रसाद मिश्रा बंगालमध्ये राजा राम मोहन रॉय, तमिळनाडूमध्ये रामास्वामी नायकर व महाराष्ट्रात महात्मा फुले यांचा प्रामुख्याने समावेश होता. या सगळ्यांच्या ढुं**** असे शिक्के असून माझ्याकडे त्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. यावर मी तासंतास भाषण देऊन मोठे खुलासे करू शकतो. असा दावा देखील त्यांनी आपल्या भाषणादरम्यान केला आहे.

साईबाबां बाबतीत बोलत असताना भिडे म्हणाले

आपला हिंदू समाज साई बाबाला पुजतो, त्या भ*** साईबाबांची लायकी काय ते तपासा. सर्वप्रथम त्या साईबाबाला आपल्या घरघरातील देव्हाऱ्यामधून बाहेर काढून फेका, लक्षात ठेवा मी काय बोलतोय. मी काही डोके सटकलेला माणूस नाही मी सर्व जबाबदारीने बोलत असून त्याला हिंदूंचा देव मानू नका असं जाहीर आवाहन करत भिडेंनी साईबाबांविषयी अतिशय खालच्या दर्जाचा आणि वादग्रस्त विधान केलं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!