देवळा : शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार होणाऱ्या लिलाव प्रक्रियेला येथील गिरणा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा विरोध कायम असताना वसाका जवळील ठेका मंजूर झालाच कसा? असा संतप्त सवाल आज सोमवारी दि १४ रोजी देवळ्याचे तहसीलदार विजय सुर्यवंशी यांना नागरिकांनी विचारला. बुधवार दि १० रोजी अवैध वाळू उपसा बंद व्हावा, तसेच नवीन वाळु धोरणानुसार ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी विठेवाडी येथिल दत्त मंदिराच्या प्रांगणात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत,उपविभागीय अधिकारी चंदशेखर देशमुख व अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी बैठकीत कुठल्याही परिस्थितीत लोहोणेर , वसाका , विठेवाडी , सावकी व खामखेडा या नदीकाठावरील वाळुचा निलाव वा ठिया मंजूर करण्यात येणार नाही, असे सांगितले असताना आदल्या दिवशी म्हणजे दि ९ रोजी विठेवाडी येथिल वसाका जवळील घाटाचा निलाव कसा झाला? याचा खुलासा आपण करावा यासाठी तहसीलदारांना पाचारण करून तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आमची दिशाभुल करण्यात आली व आमची फसवणूक केली त्याबद्दल आम्ही तुमच्या वर फसवणुकीचा गुन्हा का दाखल करण्यात येवु नये? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी यावेळी तहशिदार सुर्यवंशी यांना विचारण्यात आला.
सदरील जागेवरची निविदा जरी मंजूर करण्यात आली असली तरी,जे कोणी वाळुची आँनलाईन मागणी करतील त्यांनाच फक्त वसाका वरील ठिय्या वरुन वाळु देण्यात येईल अशी भुमिका मांडली, त्याला पाचही गावांतील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला, कुठल्याही परिस्थितीत आम्ही लोहोणेर, वसाका विठेवाडी,सावकी खामखेडा,भउर शिवारातील गिरणानदीवरील घाटावर निलाव होउ देणार नाही,असा ठाम निर्धार केला, यावेळी पाचही गावांतील ग्रामपंचायतीचे सरपंच , सदस्य , गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
हा सर्व घटनाक्रम पाहिल्यावर गिरणा नदीकाठच्या गावाचा सरकारी अधिकाऱ्यांवरचा विश्वास उडाला आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा लोहोणेर, विठेवाडी सावकी, भउर तसेच सटवाइवाडी येथील गौण खनिजांची अवैध वाळू वाहतूक होत असताना महसूल विभागाला पुराव्यानिशी कळवुनही अवैध वाळू उपसा करण्यावर कडक कारवाई होत नाहीं, वसाका जवळील वाळुच्या निकालाबाबत सांशकता निर्माण झाली असून , त्यासाठी विठेवाडी दत्त मंदिरात परत एकदा सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वरीष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या शंकेचे निरसन करावे व भोळ्याभाबड्या जनतेला न्याय मिळवून द्यावा ,अशी भुमिका यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंडितराव निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्नवयक कुबेर जाधव, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत निकम, लोहोणेरचे सरपंच सतिष देशमुख, खामखेड्याचे सरपंच वैभव पवार यांनी मांडली .
यावेळी कुठल्याही परिस्थितीत वाळुचा निलाव होउ दिला जाणार नाही ,अशा आशयाचे निवेदन महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी , स्थानिक आमदार डॉ राहुल आहेर, अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना वरील पाचही गावांतील ग्रामपंचायतीचे ठराव जोडुन पाठविण्यात येणार आहे, याला शाशन जुमानले नाही तर येत्या काही दिवसांत देवळा येथे पाच कंदील जवळ रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा ही यावेळी झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे,
बैठकीसाठी लोहोणेरचे सरपंच सतिष देशमुख, खामखेडा सरपंच वैभव पवार, सावकीचे कारभारी पवार, विठेवाडीचे नानाजी पवार, भास्कर निकम, विठोबा सोनवणे,पी डी, निकम, धना निकम, विलास निकम, राजेंद्र निकम, भालचंद्र निकम, संजय निकम, संजय सावळे, रावसाहेब निकम, अभिजित निकम, ईश्वर निकम, रामदास निकम, धनंजय बोरसे, निंबा निकम, पुंडलिक निकम, महेंद्र आहेर, स्वप्निल निकम, रविंद्र निकम, दिलिप निकम, सुभाष निकम, सुभाष कापडणीस, गणेश शेवाळे, बाळासाहेब निकम, बबलु निकम, बाबा पवार, राजेंद्र आहेर, शंकर निकम, काशिनाथ पवार, नितीन पवार, पुंडलिक सोनवणे, हेमंत निकम, आदीसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली असून येथील गिरणा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा याकामी विरोध कायम पहाता अद्याप ठेकेदारांना आदेश दिले नाहीत . यामुळे अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची फसवणूक केली असा आरोप चुकीचा आहे .वाळू लिलावास स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्याचे आपण वरिष्ठाना कळविले आहे.
– तहशिलदार विजय सुर्यवंशी ,देवळा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम