Farmers Death | शासनाच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

0
45
Farmers Death
Farmers Death

Farmers Death | गरिबी तसेच बेरोजगारी यामुळे जगणं असह्य झाले असताना सातत्याने निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतून उत्पादकतेची हमी उरलेली नाही. यातूनच शेतकरी आत्महत्या वाढल्या आणि याला आधार देण्याचे काम राज्य सरकारचे आहे. मात्र ‘इव्हेंटप्रेमी’ सरकारकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून स्वतःच्या प्रचारासाठी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम राबविला जात असल्याची जोरदार टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. (Farmers Death)

Government Job | दहावी पास उमेदवारांसाठी पोस्टात नोकरीची मोठी संधी

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर रविभवन परिसरात बुधवारी (दि. ६) महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्‍त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती, त्या वेळी ते बोलत होते. त्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, आमदार राजेश राठोड हे नेते उपस्थित होते. (Farmers Death)

Winter Session | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे कुटुंबाला घेरले

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘‘ पावसाने धान, संत्रा, तूर, कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाले असून नेहमीप्रमाणे मदतीची घोषणा करण्यात आली. परंतु गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नसल्याचे चित्र आहे. विमा भरपाई, शासन अनुदान, नियमित कर्ज फेडणाऱ्यांना प्रोत्साहन रक्‍कम देण्याचाही विसर ‘इव्हेंटप्रेमी’ सरकारला पडला असताना  या सर्व मुद्द्यांवरून सरकारला आम्ही घेरणार आहोत.’’

विदर्भ-मराठवाडा विकासाच्या गप्पा सत्ताधाऱ्यांकडून मारल्या जात असतात. मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली तसेच या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठीच सरकारकडे पैसे नसल्याचे समोर आले आहे. दूधदर हा २२ रुपयांवर आला असून ‘महानंद’ बंद करण्याची खेळी खेळली जात आहे. कांदा अनुदान, दिवाळीपूर्वी विमा अग्रिम यातील काहीच मिळाले नसताना आणेवारी आधारित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी असणार आहे.

– अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता, विधान परिषद


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here