Farmer success : त्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या कष्टाचं झालं चीज ; दुधाला मिळाला इतका उच्चांकी भाव

0
27

Framer success :  एकीकडे म्हशीच्या दुधाला बाजारात ७०-७५ रुपये भाव मिळत असताना शेतकऱ्याला कमी दरात व्यापाऱ्याला दूध विकावे लागते. मोडनिंब गावचा एक तरुण शेतकरी याला अपवाद ठरलाय.

स्वप्नील हा तरुण शेतकरी. घरी वृद्ध आई-वडील व एक भाऊ आणि केवळ चार एकर शेती. शेती हा व्यवसाय बेभरवशाचा समजला जातो यामुळे आत्ताचे युवा शेतकरी शेतीला जोडधंदा आवर्जून करतात आणि आपल्यालाही शेतीला जोडधंदा म्हणून स्वप्नीलने मुऱ्हा जातीच्या दोन म्हशीचे पालन करायच ठरवलं. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या मोडनिंब येथील ‘अमूल’च्या दूध संकलन Framer successकेंद्रावर स्वप्नील दररोज दूध पाठवतो याठिकाणी प्रतवारीप्रमाणे दुधाचा दर ठरत असल्यामुळे त्याच्या म्हशीच्या दुधाला ९८.५९ प्रति लिटर इतका उच्चांकी दर मिळाला आहे.

https://thepointnow.in/death-news/

शेतकऱ्यांसारख ‘दातृत्व’ कोणाकडेच नसते अस नेहमी म्हटलं जातं. याच कारण म्हणजे हमी नसताना ही शेतकरी शेती करतो. आपल्या वावरात पिकाच्या रुपात विस्कटलेल्या पैशाचे आणि श्रमाचे मोल कोणीतरी त्रयस्थ व्यापारी करून टाकतो. तेजीपेक्षा मंदीतच कायम सापडणारा तो शेतकरी असतो. मात्र यश लाभलं की आपल्या पदरात पाडणाऱ्याचे ऋण तो कधीही विसरत नाही.Framer success

असाच मोडनिंब येथील तरुण दूध उत्पादक शेतकरी स्वप्नील सत्यवान शिंदे. या तरुण शेतकऱ्याच्या म्हशीच्या दुधाला अमूलच्या दूध संकलन केंद्रावर प्रति लिटर ९८.५९ रुपये असा उच्चांकी दर मिळाला आणि आनंदाने भारूनFramer success गेलेल्या स्वप्नील ने म्हशीला रंगवून, पेढे भरवून तिचा सत्कारच केला आणि तिच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केल्याच बघायला मिळालं.

आनंदाच्या भरामध्ये स्वप्नीलने आपल्या म्हशीला रंगीबेरंगी फुगे लावून, पेढा भरवून कौतुक केले आणि कुटुंबासमवेत आनंद साजरा केला. आपल्याला सुखवणाऱ्या या गोठ्यातील मुक्या जनावराचा स्वप्नीलने केलेला हा ‘सत्कार समारंभ’ कौतुकाचा विषय ठरत आहे.Framer success

जनावरांना सकस आहारासोबत मिनरल्स मिक्श्‍चर व लिक्विड कॅल्शिअम दिल्यास फॅट व एसएनएफ वाढण्यास मदत होते, यासोबतच गोचीड व जंतनिर्मूलन केल्यास जनावराचे शारीरिक आरोग्य चांगले राहते आणि कोणतेही दुष्परिणाम न होता उच्च प्रतीचे दूध उत्पादन घेता येते. अशी माहिती मोडनिंब च्या पशुधन अधिकाऱ्यांनी दिली आहे.Framer success

मोडनिंबमधील दोन शेतकऱ्यांना म्हशीच्या दुधासाठी ९८.५९ रुपये प्रति लिटर दर मिळाला. स्वप्नील सत्यवान शिंदे व महादेव जाडकर या दूध उत्पादकांना म्हशीच्या दुधासाठी हा दर मिळाला असून १२ फॅट व ९.९ एस.एन.एफ. दुधाची प्रतवारी मिळाल्याने, त्यांना हा दर मिळालाय. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्याच्या म्हशीच्या प्रेमापोटी हा आनंद अशा पद्धतीने साजरा केला. याच करावं तितक कौतुक कमीच आहे.

-प्रथमेश शिंदे चेअरमन, अमूल दूध संकलन केंद्र, मोडनिंब


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here