Skip to content

Extra material affair : शेजारील गावातील विवाहितेवर त्याचा जीव जडला ; एक दिवशी हा प्रकार उघडकीस आला आणि घडलं अस की….


Extra material affair : दोन मुलांची आई असलेल्या एका महिलेच्या प्रेमात एक तरुण पडला. काही दिवसात मैत्री झाली आणि मग प्रेम, दोघंही लपूनछपून एकमेकांना भेटायचे. मात्र, त्याचदरम्यान प्रेयसीला भेटायला आलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर गावकऱ्यांनी गावातील मंदिरात दोघांचे लग्न लावून दिले.

या घटनेमुळे त्या दोघांनाही धक्काच बसला. मध्यप्रदेशातील छपरा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सोनम देवी असं महिलेचे नाव आहे. तिचा पती गावातच मजुरी करायचा. अनेकदा तो गावात रहात नसल्याने पती गावात नसताना तिची शेजारील गावात रहाणाऱ्या उपेंद्र कुमार सोबत ओळख झाली. शेजारी गावात रहायला असल्यामुळं त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि बघता बघता या मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले.

सोनमला पहिल्या पतीपासून दोन मुलं आहेत. तरीदेखील तिचा उपेंद्रवर जीव जडला. आणि प्रेमातून ओढ निर्माण झाल्याने दोघंही एकमेकांना लपत-छपत भेटत राहिले

दरम्यान सोमनचा प्रियकर उपेंद्र हा अविवाहित होता. त्याला भेटण्यासाठी सोनम नेहमी तिच्या माहेरी जात असे. त्यानंतर माहेरच्या गावापासून जवळच असलेल्या एका बाजारात ते दोघे नेहमी भेटायचे. परंतु, एक दिवस दोघांनाही तरुणाच्या नातेवाईकांनी रंगेहात पकडले. सुरुवातीला युवकाच्या घरच्यांनी त्यांच्या नात्याला कडाडून विरोध केला. मात्र, तरीही उपेंद्र सोनम सोबतच लग्न करण्याच्या हट्टावर अडून राहिला.

https://thepointnow.in/farmer-success/
घरच्यांनी व गावकऱ्यांनी हे प्रकरण मग पंचायतीसमोर आणले. त्यानंतर गावच्या मुख्य व्यक्तींनी दोघांनाही समोर आणून उभे केले व पंचायतींनी या दोघांचेही लग्न लावून देण्यास सांगितले. लागलीच पूर्ण गावा समोरच त्या दोघांचे लग्न लावण्यात आले.

गावातील महादेव मंदिरामध्ये लग्न लावण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी हर हर महादेवचा जयघोष देखील केला. सोनम व उपेंद्र या जोडप्याचे लग्न गावातील मुखिया राजेष राय, सुनील कुमार राम, सरपंच राजेश शर्मा, विकासमंत्री वीरेंद्र राम आणि गावकऱ्यांसमोर लावून देण्यात आलं आहे. गावच्या पंचायतीने घेतलेला हा निर्णयामुळं दोघे पती-पत्नी आज खुश आहेत.

एकीकडे प्रेमविवाहांना कडाडून विरोध होत असल्याच्या घटना समोर येत असताना दुसरीकडे एका लहानश्या गावातील पंचायत मंडळाने हा निर्णय घेतल्याने त्याच्या निर्णयाचे कौतुक देखील केले जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!