Murder : एकाच कुटुंबातील ४ लोकांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना राजस्थान मधील जोधपूर मध्ये घडली आहे. या घटनेत ६ महिन्याच्या चिमुकलीची देखील हत्या करण्यात आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. एकाच कुटुंबातील प्रमुख व्यक्ती, त्याची पत्नी, सून आणि नाती यांची गळा चिरून हत्या करण्यात आली असून गुन्हेगार इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी सर्व मृतदेह फरफटत अंगणात आणून ते पेटवून दिल्याने खळबळ माजली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राजस्थान मधील जोधपूर जवळ असलेल्या चेराई गावात ही घटना घडली आहे. याठिकाणी रात्री एक कुटुंब घरात झोपलेलं होतं. यावेळी संशयित आरोपी त्यांच्या घऱात घुसले आणि त्यांनी चारही जणांची निर्दयी हत्या केली. मृतांमध्ये सहा महिन्याच्या मुलीचा देखील समावेश आहे. यावर त्यांची मजल न थांबता हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेह खेचत अंगणात आणून त्यांना आग लावली.
https://thepointnow.in/transformer-blast-in-namami-gange-project-site/
गावकऱ्यांना सकाळी मयत पीडित कुटुंबाच्या घरातून धूर येताना दिसल्याने ग्रामस्थांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला. यावेळी घटनास्थळी अंगणात चार जळलेले मृतदेह पडलेले होते. यामध्ये सहा महिन्याच्या मुलीचाही मृतदेह होता, जो जवळपास पूर्णपणे जळाला होता. तर इतर मृतदेह अर्धवट जळाले होते. दरम्यान ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस लागलीच घटनास्थळी दाखल झाल्यानंतर याठिकाणी फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यात आलं आहे. फॉरेन्सिक एक्स्पर्ट घटनास्थळावरुन पुरावे गोळा करत असून मृत कुटुंब शेतीचं काम करत होतं अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
दरम्यान ही हत्या कोणी आणि का केली याची माहिती अद्याप मिळालेली नाही आणि आरोपी कुठून आले होते, किती जण यात सामील होते, आणि कोणत्या शस्त्राने त्यांची हत्या करण्यात आली. याची माहिती पोलीस घेत आहेत. पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करत आहेत. तसंच ग्रामस्थांची देखील चौकशी केली जात आहे.
घडलेल्या या घटनेने संपूर्ण गावात भीतीच वतावरण पसरल असून संपूर्ण राजस्थान हादरले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम