फेम सिग्नलवर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

0
2

नाशिक : शहरातील नाशिक-पुणे महामार्गावरील फेम सिग्नल येथे एका ट्रकने दुचाकीला धडक दिली असून या दुर्घटनेत दुचाकीस्वार महिला ठार झाली आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.

फेम सिग्नलजवळचा हा रस्ता अरुंद आहे. कारण या रस्त्याच्या मधोमध मोठा नाला जात असून, बाजूला अनेक गाड्या पार्क केलेल्या असतात. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताच्या अनेक घटना घडत असतात. काल (दि. १३) रोजी एक ॲक्टिवा दुचाकी सदर रस्त्याने जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने (एमएच १५ एजी ८२१०) ओव्हरटेक करण्याच्या नादात त्या ॲक्टिवाला धडक दिली. यात ॲक्टिवा चालवणारी महिलेचा मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत असलेले त्यांचे पती व नात हे किरकोळ जखमी झाले आहेत.

लता शशिकांत गांगुर्डे (५६, रा. दसक, जेलरोड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव असून त्यांचे पती व लहान नात किरकोळ जखमी झाले आहे. दरम्यान, शशिकांत गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गांगुर्डे दाम्पत्य व त्यांची लहान नात यांना घेऊन ते ॲक्टिवा दुचाकीवरून नाशिक-पुणे रोडवरील फेम सिग्नलकडून डावीकडे वळाले. यावेळी जनता विद्यालयाच्या विरुद्ध बाजुला असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने ओव्हर टेक करण्याच्या नादात गांगुर्डे यांच्या ॲक्टिवाला धडक दिली.

यात ॲक्टिवावर पाठीमागे बसलेल्या लता गांगुर्डे या गंभीररित्या जखमी झाल्या. तर पती शशिकांत गांगुर्डे व त्यांची नात हे किरकोळ जखमी झाले. मात्र, लता गांगुर्डे यांना त्वरित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी संशयित ट्रकचालक दिलीप विश्‍वनाथ वाघ (५३, रा. पेठरोड) याच्याविरोधात उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक पी.डी. चौधरी हे पुढील तपास करीत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here