Fake currency : छत्रपती संभाजीनगरमध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात

0
20

Ch. Sambhajinagar fake currency : मागील काही दिवसांत संभाजीनगर जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आल्याची चर्चा पाहायला मिळत असताना, प्रत्यक्षात 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याचे पाहायला मिळत आहे

छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूरमध्ये आणि सोलापूरच्या बार्शीत देखील बनावट नोटा चलनात आणण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वैजापूर शहरात अज्ञात भामट्याने 500 रुपयांच्या पाच बनावट नोटा देऊन तीन विक्रेत्यांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील दोघांना बीडच्या परळीमधून ताब्यात घेण्यात आले आहे. पाचशे रुपयांची हुबेहूब दिसणारी चलनी नोट निरखून बघितल्यावर ती बनावट असल्याचे लक्षात येते, मात्र तोपर्यंत बनावट नोट लक्षात येत नाही. दरम्यान वैजापूर शहरातील जुने बसस्थानक परिसरात असलेल्या काही विक्रेत्यांना अशाच बनावट नोटा देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. त्या नोटा खोट्या असल्याचे समोर आल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे नोटांची खात्री करूनच व्यवहार करावा, असे आवाहन स्थानिक पोलिसांनी केले आहे.

सोलापूरच्या बार्शी शहरातील एका व्यापाऱ्यास बोगस नोटा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान याची माहिती बार्शी शहर पोलिसांना लागताच त्यांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांची झडती घेतली असता दोघांकडे 100 रुपयांच्या 20 बनावट नोटा आढळून आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी सुनील चंद्रसेन कोथींबिरे (वय 23, रा. पिंपळगाव नकले, ता. माजलगाव ह. मु. माळीनगर अंबाजोगाई) व आदित्य धनंजय सातभाई (रा. तडोळी, ता. परळी, ह.मु.स्टेशन लाईन गांधी मार्केट परळी) या दोघांना ताब्यात घेऊन बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here