Pandharpur : नाशिक आगारातून पंढरपूरसाठी धावणार जादा बसेस

0
29

Pandharpur : आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून वारकरी पंढरपूरला पायी रवाना झाले आहेत. अनेक नागरिकांना आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरला जाण्याची इच्छा असते. याच भाविकांचा विचार करता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ दरवर्षी जादा बसेसचे नियोजन करत असते. नाशिक विभागानेही आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांना पंढरपूरला जाता यावे म्हणून जादा बसेस चे नियोजन केले आहे.

नाशिक विभागातून 25 जून ते 4 जुलै या दरम्यान पंढरपूर साठी जवळपास 290 जादा बसचे नियोजन केले आहे. आषाढी एकादशी निमित्त राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. तर या सुविधेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

29 जून रोजी आषाढी एकादशी असून तीन जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. या काळात पंढरपूरकडे असणारी यात्रेकरूंची गर्दी लक्षात घेता नाशिक विभागाच्या वतीने ज्यादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.

नाशिक एक आणि दोन आगार महामार्ग बस स्थानक मालेगावातील नवीन बस स्थानक, सटाणा, नामपुर, देवळा, तहाराबाद, मनमाड, चांदवड, सिन्नर, वावी, लासलगाव, विंचूर, निफाड, चांदोरी, नांदगाव, इगतपुरी, घोटी, येवला, कळवण, वणी, पिंपळगाव बसवंत, ओझर येथून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

पंढरपूरसाठी नाशिक आगारातून सोडण्यात येणाऱ्या नियमित बसेस ना प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद लाभत असल्याचं यावेळी सांगण्यात आल आहे. त्यामुळेच जादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे…

प्रवाशांकडून सुरक्षित प्रवास म्हणून नेहमीच एसटीला प्राधान्य दिले जाते. आषाढी एकादशी निमित्ताने शहर आणि ग्रामीण भागातील भाविकांना पंढरपूर येथे जाण्यासाठी 21 जूनपासून जादा बस सेवा सुरू करण्यात आले आहेत.

या बससेवेला राज्य परिवहन महामंडळाच्या महिला सन्मान योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या 50 टक्के सवलतीचा तसेच 65 ते 75 वर्षाच्या जेष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलतीचा व अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेमार्फत मोफत प्रवास सुविधेचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पंढरपूरच्या आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असतो आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते त्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here