Entertainment News | जिराफ थिएटर्सच्या ‘गुडबाय किस’ चा नाशकात रंगणार प्रयोग

0
21
Entertainment News
Entertainment News

Entertainment News | अश्विनी भालेराव – नाशिक : आजकालच्या काळात नाटकांची जागा ओटीटी प्लॅटफॉर्म आणि वेबसिरीज यांनी घेतलेली असून आजकाल तरुण वर्ग नाट्यगृहांकडे फार कमी प्रमाणात वळतो. मात्र यातच सध्या तरुणाईला नाट्यगृहांकडे आकर्षित करण्यासाठी नाटकांत अनेक वेगवेगळे प्रयत्न केले जातात. दरम्यान,  ठाण्यातील ‘जिराफ थिएटर्स’ या संस्थेचे नवीन प्रायोगिक नाटक ‘गुडबाय किस’ रंगभूमीवर आले आहे. येत्या गुरुवारी (दि. २८) ‘गुडबाय किस’ नाटकाचा प्रयोग नाशिकच्या कालिदास कलामंदिरात संध्याकाळी पावणे सहा वाजता रंगणार आहे.

Thackeray Brothers | ठाकरे बंधूंची भेट; कुठे अन् काय झाली चर्चा…वाचा सविस्तर

यापुर्वी जिराफ थिएटर्सचे ‘स्टार’ या नाटकाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली होती. याशिवाय या संस्थेचे सरफिऱ्या, सुंदरी, जून-जुलै, साईन्टिस्ट, रेनबोवाला आदी नाटकांनी महाराष्ट्रातील अनेक एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा यांमध्ये यश मिळवले आहे. ‘गुडबाय किस’ हा एक दीर्घांक असून या नाटकातून आपल्याला एका उत्कट प्रेमकथेतून ‘शेवटच्या भेटीतल्या, शेवटच्या श्वासांची गोष्ट’ उलगडणार आहे. नात्यांचे बंध, प्रेम अधोरेखित करणाऱ्या या नाटकाचे पुणे, कल्याण, बोरिवली, माटुंगा येथे प्रयोग झाले असताना आता या नाटकाचा नाशिक येथे प्रयोग होत असून या नाटकात बॉबी आणि अक्षता टाले यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. तरीही नाशिककरांनी या नाटकाला हजेरी लावावी असं आवाहन ‘जिराफ थिएटर्स’ या संस्थेच्या वतीने करण्यात आलं आहे.

Deola Agro | देवळा ऍग्रो कंपनीची उत्कृष्ट कंपनी पुरस्कारासाठी निवड

Entertainment News | यापुर्वी नाट्यस्पर्धेत या संस्थेची जोरदार कामगिरी

राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या जिराफ थिएटर्स ‘स्टार’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत मानाच्या जयंत करंडकावर आपले नाव कोरलेले आहे. याशिवाय या संस्थेची सरफिऱ्या, सुंदरी, जून-जुलै, साईन्टिस्ट, रेनबोवाला या नाटकांनी महाराष्ट्रातील अनेक नाट्यस्पर्धा गाजवलेलेया आहे. त्यामुळे ‘गुडबाय किस’ हे नाटक नाट्यरसिकांसाठी आणखी काय नविन घेऊन येतं हे पाहणं रंजक असणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here