Nashik : देवळाली कॅन्टोमेंटच्या विलकरणाला या कारणाने होतोय विरोध…

0
36

Nashik : देशभरातील कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरी वसाहतींचा भाग हा जवळच्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे विलीन केला जाणार आहे, मात्र या निर्णयाला कॅन्टोन्मेंट संस्थेत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अनेक कारणांस्तव विरोध दर्शवला आहे.

 

देवळाली कॅन्टोन्मेंट एम्प्लॉईज युनियनने दिलेल्या माहितीनुसार, नागरी हद्द विलीनीकरण करायचे असल्यास त्या कामासाठी कॅन्टोन्मेंट संस्थेत नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पेन्शन बाबत असलेल्या तक्रारी सोडवणे व इतर स्थानिक समस्या उभ्या राहणार आहेत. याबाबत उदाहरण देताना एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष एम. आय. खान, सेक्रेटरी संजीव राजोरा, उपाध्यक्ष सुरेंद्र मेहरोलिया आदींनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की हिमाचल प्रदेशातील कसाल कॅन्टोन्मेंट परिषद हद्द जवळील स्थानिक स्वराज्य संस्थेत विलीन झाली, त्यावेळी या कॅन्टोन्मेंट मधील कर्मचाऱ्यांची बदली दीडशे कि. मी. अंतरावर असलेल्या कॅन्टोन्मेंटमध्ये करण्यात आली, तर अनेक पेन्शनर्स ना पेन्शन घेणे व इतर कामांसाठी तब्बल तीनशे किलोमीटर लांब जावे लागत आहे. यासह मासिक पगार घेणे, सेवा ज्येष्ठता ठरविणे, वैद्यकीय सवलती, ग्रॅच्युइटी, पेन्शन आदी सोयी सवलती मिळविण्यासाठी अशा दूरदूरच्या अंतरावरील कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे जावे लागत आहे.

 

कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांच्या या अडचणी दूर करण्यासाठी एम्प्लॉईज युनियनने काही सूचनाही केल्या आहेत. त्यानुसार जे कर्मचारी 20 वर्षांहून अधिक काळ एखाद्या कॅन्टोन्मेंटमध्ये नोकरीस आहेत, त्यांना त्याच कॅन्टोन्मेंट मध्ये कायम ठेवावे वा ती हद्द ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत विलीन होत असेल, त्या नगर परिषदेने कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांच्या नोकरीची जबाबदारी घ्यावी. एखादा कर्मचारी कामावर असताना मृत्युमुखी पडला तर त्याच्या वारसांना संबंधित कॅन्टोन्मेंटमध्ये अनुकंपा तत्त्वाने कायम नियुक्ती द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

देशभरात सर्व कॅन्टोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांना अनेक स्वरूपाच्या अडचणी येणार असल्यामुळे देवळाली कॅन्टोन्मेंट एम्प्लॉईज युनियनने कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या समस्या व मागण्यांचे निवेदन दिले असून, केंद्रीय संरक्षणमंत्री आणि इतर संबंधित यंत्रणांनीदेखील या समस्येची नोंद घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

देवळाली कॅन्टोन्मेंट एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष एम. आय. खान यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुरेंद्र मेहरोलिया, सेक्रेटरी संजीव राजोरा, असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. यू. ए. पत्की, तसेच जगपाल चंडोलिया, चित्रा सोनवणे, शिवाजी सपकाळे, कमल किशोर, राजू सकट, संजय भवर, राजबीर बहोत, विनोद खरालिया, सुदाम ताजनपुरे, दिलीप भालेराव, रेखा पगारे, विलास चांदणे आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here