(Election) : एकीकडे राज्यांमध्ये सत्तांतराच्या चर्चांना उधान आले असतानाच, दुसरीकडे जिल्हा सहकारी बँकेच्या इतिहासामध्ये तब्बल 27 वर्षानंतर सत्तांतर झाल आहे.
वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिलेल्या जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीमध्ये गेल्या 27 वर्षांपासून आपला प्रस्त असलेल्या समता पॅनलच्या सत्तेला यंदा सुरुंग लागला आहे. सहकार पॅनलने यंदा सर्वच्या सर्व 21 जागांवर दणदणीत विजय मिळवत समता पॅनलच्या सर्वच उमेदवारांना पराभूत केल आहे. (Election) गेल्या 27 वर्षांपासून जिल्हा सहकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेवर समता पॅनलची सत्ता होती.
जिल्हा सहकारी बँकेच्या 21 जागांसाठी यावर्षी 71 टक्के मतदान झाले. मागील पंचवार्षिकच्या तुलनेमध्ये यंदा दुप्पट मतदान झाल्यामुळे या निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष वेधलं गेलं होतं. शासन निर्णय आणि न्यायालयाच्या निर्णयामुळे जवळपास पाच हजारांपेक्षा अधिक मतदारांची नावे यादी मधून वगळली गेली होती. मात्र तरीसुद्धा यंदा मतदानाला मतदारांचा लक्षणीय प्रतिसाद मिळाल्याचे बघायला मिळाले. नाशिकच्या औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या लक्ष्मी लॉन्स येथे मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी आणि विभागीय निबंधक गौतम बलसाने यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. (Election) यंदा देखील ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या असतानाच पॅनलच्या सहा जणांनी बंड पुकारत सहकार पॅनल ची स्थापना केली आणि या पॅनलने सत्ताधारी समता पॅनलचा दारुण पराभव केला यंदाच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पॅनल चा एकही उमेदवार होऊ शकला नाही तर जवळपास अडीच दशकांनंतर बँकेमध्ये परिवर्तन घडून आल्याने विजयी उमेदवार व समर्थकांकडून एकच जल्लोष केला गेल्याचं चित्र बघायला मिळालं.
विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे
सर्वसाधारण गटात सहकार पॅनलचे अजित आव्हाड, सुनील गीते, विनोद जवागे, बाळासाहेब ठाकरे, विजय देवरे, निलेश देशमुख, प्रमोद निरगुडे, रवींद्र बाविस्कर, ज्ञानेश्वर माळोदे, महेश मुळे, भरत राठोड, जयंत शिंदे हे उमेदवार विजयी झाले आहेत. तर तालुका प्रतिनिधी गटामध्ये अमोल बागुल, सचिन विंचुरकर, अभिजीत घोडेराव, रमेश बोडके तर महिला राखीव गटात धनश्री कापडणीस, मंदाकिनी पवार अनुसूचित जाती जमाती गटातून मोहन गांगुर्डे विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग प्रवर्गातून मतदारसंघांमध्ये रवींद्र आंधळे इतर मागासवर्ग गटात विक्रम पिंगळे हे विजयी झाले आहेत.
विजय आणि पराभूत उमेदवारांमध्ये जवळपास 700 ते 1000 मतांच अंतर होतं. (Election) शासकीय कार्यालयातील सुशिक्षित कर्मचारी निवडणुकीमध्ये मतदार होते मात्र निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मते बाद झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सर्वसाधारण गटांमध्ये 310 मतपत्रिका अवैध ठरविण्यात आल्या, तालुका प्रतिनिधी गट अध्यक्ष 196, तर इतर मागासवर्ग गटात 155, महिला राखीव गटात 141, अनुसूचित जाती जमाती गटात 174, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गीय गटातून 155 मतपत्रिका अवैध ठरवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. सुशिक्षित शासकीय कर्मचारी निवडणुकीमध्ये मतदार असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर मते बाद झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम