Skip to content

टीव्ही मालिका निर्मात्या एकता कपूर त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला; फोटो व्हायरल


नाशिक : प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्माता एकता कपूर या आज त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी जिल्ह्यात आल्या होत्या. त्यांच्या दर्शनाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.

त्या इथे येण्यापूर्वी गेल्या २० सप्टेंबरला त्यांनी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आज श्री त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन घेत गोदावरीस कुशावर्त तीर्थावर वंदन केले. याप्रसंगी त्र्यंबकेश्वर मंदिराचे प्रसिद्ध धनंजय शास्त्री अकोलकर व बंधूंनी त्यांच्या पूजेचे पौरोहित्य करून आशीर्वाद दिले आहे. देवदर्शनानंतर त्यांनी एका दुकानातूनदेवता मूर्ती खरेदी केल्या आहेत. दरम्यान, त्या इथे आल्या असत्या अनेकांनी त्यांचे फोटो काढले व ते व्हायरल झाले.

निर्मात्या एकता कपूर यांची त्रंबकेश्वरवर धार्मिक श्रद्धा असून यापूर्वीही त्यांनी अनेकदा त्यांचे वडील व ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत त्र्यंबकेश्वरचे येथे दर्शन घेतलेले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!