अजगराच्या विळख्यातून शिवसैनिकांना वाचवायचे; एकनाथ शिंदेंचे नवे ट्विट


एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना उद्देशून ट्विट केले आहे
एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना ट्विट केले की, ‘नीट समजून घ्या, एमव्हीए. चा खेळ ओळखा..! शिवसेना आणि शिवसैनिकांना MVA च्या अजगराच्या तावडीतून सोडवण्यासाठी मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हितासाठी समर्पित आहे. तुमचे एकनाथ संभाजी शिंदे.’ असे म्हटले आहे.

दीपक केसरकर म्हणाले- अन्य राजकीय पक्षात विलीन होणार नाही
शिवसेनेचे नाराज आमदार दीपक केसरकर यांनी शनिवारी सांगितले की, बंडखोर गटाला विधिमंडळ पक्षात दोन तृतीयांश बहुमत आहे आणि ते सभागृहात आपली संख्या सिद्ध करतील परंतु इतर कोणत्याही राजकीय पक्षात विलीन होणार नाहीत.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भेटीची माहिती नाही : दीपक केसरकर
महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्यादरम्यान, दीपक केसरकर यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, काल रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली की नाही हे मला माहिती नाही. याशिवाय काल रात्री शिंदे कुठे गेले होते, याचीही माहिती नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!