‘स्मारक बांधतांना बाळासाहेब ठाकरे संपूर्ण हिंदुस्थानचे आणि आता फक्त तुमचे कसे?’


द पॉईंट नाऊ ब्युरो : बाळासाहेब ठाकरे हा एक विचार आहे. आणि विचार कोणाची खाजगी मालमत्ता नाही राहत. असा टोमणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना मारला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी, ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा. असे आव्हान शिंदे गटाला केले होते. तर नुकतेच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा शिंदे गटाला आव्हान करतांना, तुमच्या बापाचे नाव वापरा, माझ्या बापाचे का वापरता म्हणून सवाल केला होता.

यावरून संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. ज्यावेळी महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक बांधायचे होते, त्यावेळी ते सर्व हिंदुस्थानचे होते. आणि आता फक्त तुमचेच असे कसं म्हणू शकता, म्हणून देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न केला आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हा एक विचार आहे. आणि विचार हा कुठल्या व्यक्ती किंवा पक्षाची खाजगी मालमत्ता नसते. असे देशपांडे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात ढवळून निघालेले राजकारण आणि त्याला कारण असलेले शिवसेनेतील बंडखोर आमदार यामुळे राजकीय गोटातच चलबिचल आणि धावपळ सुरू आहे. त्यात आता मनसेने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!