Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन; रॅली सोडून धावले चिमूकल्याच्या मदतीला 

0
87
Eknath Shinde
Eknath Shinde

ठाणे | महायुतीत काही जागांसाठी वाद सुरू होता. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी या जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महायुतीत अगदी प्रतिष्ठेच्या असलेल्या या जागा राखण्यात शिंदे गटाला यश आले. यापैकीच एक म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला ‘ठाणे’. या जागेवर शिवसेनेकडून ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली. नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ आज किसन नगर परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान, पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संवेदनशील रुप दिसून आले.

Eknath Shinde | रॅली सोडून मुख्यमंत्री चिमूकल्याच्या मदतीला 

दरम्यान, शिंदे गटाचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांची ही प्रचार रॅली किसन नगर येथे पोहोचली असता, यावेळी मुख्यमंत्र्यांना एक आई आपल्या जखमी असलेल्या मुलाचा हात हातात घेऊन रस्त्याने पायी जाताना दिसली. या आईच्या खांद्यावर एक मूल आणि हातात दुसरे मूल होते. हातात असलेल्या मुलाचा हात गंभीररित्या भाजलेला होता. त्यामुळे त्याची आई त्याला दवाखान्यात घेऊन जात होती.(Eknath Shinde)

त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या महिलेला आणि मुलांना पाहिले आणि ते रॅली सोडून त्यांच्या मदतीला धाऊन गेले. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्या मुलाला घेऊन तेथील जवळच्या मानवता हॉस्पिटलमध्ये स्वतः घेऊन गेले. तिथे जाऊन त्यांनी संबंधित डॉक्टरांना त्या जखमी मुलाच्या भाजलेल्या हातावर तातडीने उपचार करावयास सांगितले.

Eknath Shinde | ‘बिलो द बेल्ट टीका’ नको; एकनाथ शिंदेंच्या १२ सूचना

यापूर्वीही घडले मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन 

मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र, यापूर्वीही अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचे दर्शन महाराष्ट्राला घडलेले आहे. काही महिन्यांपूर्वी एका दौऱ्यादरम्यान अपघातातील जखमींच्याही ते मदतीला धाऊन गेले होते. रुग्णावाहिकेतून रुग्णालयात स्वतः ते त्यांना घेऊन गेले होते. तर, डॉक्टरांनाही उपचाराबाबत सूचना दिल्या होत्या.  (Eknath Shinde)

तर, यावेळी जखमी असलेल्या नऊ वर्षीय रुद्रांश रोनीत चौधरी या मुलाला मुख्यमंत्र्यांनी मदत केली आहे. हा मुलगा घरात खेळत असताना त्याच्या हातावर तेल सांडले आणि यामुळे त्याचा हात गंभीररीत्या भाजला होता. उपचारासाठी त्याची आई त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना रॅलीत सहभागी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्याला पहिले आणि ते त्याला रुग्णालयात घेऊन गेले.

Eknath Shinde | मी मेहनती, प्रामाणिक आणि कष्टाळू आहे; माझ्यावर मोदींची जादू

एकीकडे कौतुक दुसरीकडे प्रचार स्टंट असल्याच्या टिका

यानंतर तिथे त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू झाले आणि तो सुखरूप असल्याची खात्री करूनच मुख्यमंत्री पुन्हा प्रचार रॅलीत सहभागी होण्यासाठी रुग्णालयातून निघाले. मात्र मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि त्यांच्या संवेदनशीलतेमुळे एकीकडे त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. तर, दुसरीकडे विरोधकांकडून हा प्रचाराचा स्टंट असल्याच्या टिका होत आहेत. (Eknath Shinde)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here