मुंबई – राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी करत जोरदार झटका दिला. पक्षविरोधी कारवाई करून सेना फोडण्याचा प्रयत्न केला, असा ठपका लावत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची पक्षनेते पदावरून हकालपट्टी केली.
शिवसेनेने जाहीर केलेल्या पत्रकात असे लिहिले की, पक्षविरोधी कारवाई करत तुम्ही शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. पत्रात असेही नमूद केले की, आपण स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्व सोडले. पत्रकावर उद्धव ठाकरेंची सही आहे. हे पत्र पक्षाची शिस्तपालन समिती आणि राष्ट्रीय कार्यकारिणीलाही पाठवण्यात आले आहे.

सकाळीच मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही असे थेट सांगत एकनाथ शिंदेना त्यांनी सेनेचे नाहीत असे म्हणून नाकारले. त्यानंतर सायंकाळी एक पत्र काढून ठाकरे यांनी शिवसेनेचे स्वेच्छेने सदस्यत्व सोडले तसेच पक्षविरोधी कारवाई करून सेना फोडण्याचा प्रयत्न केला, असा ठपका ठेवत त्यांची पक्षनेते पदावरून हकालपट्टी केली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३९ आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम