Skip to content

नीरज चोप्राने पुन्हा मोडला स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम; रौप्य पदकावर कोरले नाव


नवी दिल्ली – टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेतील भारताचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा एकामागोमाग एक विक्रमांचा धडाका लावत आहे. आज त्याने स्टॉकहोम येथील डायमंड लीग स्पर्धेत नवा इतिहास रचला आहे. नीरजने ८९.९४ मीटरच्या शानदार थ्रोसह आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला. यासह त्याने स्पर्धेत रौप्य पदक मिळवले.

नीरज चोप्राचा ९० मीटरचा थ्रो अवघ्या ६ सेमीने चुकला त्यामुळे तो रौप्य पदकाचा मानकरी ठरला. परंतु, नवा राष्ट्रीय विक्रम रचत त्याने या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी केली आहे. ॲथलेटिक्समधील प्रतिष्ठित डायमंड लीग स्पर्धेत त्याने प्रथमच पहिल्या तीनमध्ये स्थान पटकावले आहे. ऑलिंपिक चॅम्पियन नीरज चोप्राने जागतिक विजेता अँडरसन पीटर्सनंतर दुसरे स्थान पटकावले. पीटर्सने ९०.३१ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. याआधी त्याने फिनलँड येथे झालेल्या पावो नूरमी ॲथलेटिक्स मीटमध्ये रौप्य पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. त्यानंतर कुओर्ताने स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले.

नीरजने केलेल्या कामगिरीचे केंद्रीय क्रीडा आणि माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटरद्वारे अभिनंदन केले. अनुराग ठाकूर यांनी ट्विट केले की, “ऑलिंपिक चॅम्पियन नीरज चोप्राने एक नवीन राष्ट्रीय विक्रम केला. २०२२ स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने ८९.९४ मीटर भाला फेकून स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले.” ठाकूर यांनी ट्विटसोबत त्याचा व्हिडीओही शेअर केला आहे.

https://twitter.com/ianuragthakur/status/1542686810676944896?t=yNaZdIYvtO_avgeIinwtFQ&s=19

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!