मुंबई : सध्या राज्यात महायुतीकडून मोदींचे ४०० पार चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी मोठे परिश्रम घेतले जात असून, यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ग्राउंड लेवलवर उतरून कामाला लागले आहे. दरम्यान, यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान मोदी यांच्या आपुलकीने भारावून गेले आहेत.
यावेळी ते म्हणाले की, “अलीकडच्या काळात मी पंतप्रधान मोदी यांची आणि माझी सतत भेट होत होती. त्यावेळी ते सतत सांगायचे की, “आता तुझा आवाज बसणार आहे”. असं त्यांनी दोनवेळा सांगितलं. तेव्हा काहीही नाही झालं, मात्र तिसऱ्या वेळी त्यांनी सांगितल्यानंतर माझा आवाज खरंच बसला. यानंतर ज्यावेळी पंतप्रधान मोदी भेटले. तेव्हा त्यांनी स्वत:ची काळजी घ्या, थोडी झोप घ्या, असा सल्ला दिला.
Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन; रॅली सोडून धावले चिमूकल्याच्या मदतीला
Eknath Shinde | नाकात गाईचं तूप टाकण्याचा सल्ला
तसेच त्यांनी मला रात्री झोपण्यापूर्वी गुळण्या करण्याचा आणि नाकात गाईचं तूप टाकण्यासही सांगितले. एवढे मोठे देशाचे पंतप्रधान पण माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याचाही ते किती विचार करतात, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांवर कौतुकसुमनांची उधळण केली. आज मुंबई येथे आयोजित जैन समाजाच्या (Jain Community) मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदींच्या मनात आपल्यासोबतच्या नेत्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांविषयी कशी आपलुकी आणि प्रेमभावना आहे. हे सांगण्याचा प्रयत्न यावेळी शिंदेंनी केला. तसेच “अशा पंतप्रधानांसोबत आम्ही करत असल्याचा मला अभिमान आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्र राज्याचाही विकास करत आहोत, असेही ते म्हणाले.
Eknath Shinde | ‘बिलो द बेल्ट टीका’ नको; एकनाथ शिंदेंच्या १२ सूचना
पंतप्रधान मोदींचे आज महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून, आज नाशिक, कल्याण येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर, आज घाटकोपर परिसरातही त्यांचा संध्याकाळी रोड शो होणार आहे. त्यामुळे दुपारी २ वाजेपासून रात्री १० पर्यंत घाटकोपरच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरून घाटकोपर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या महात्मा गांधी मार्गाकडे जाणारा मार्ग बंद असणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम