नाशिक: गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दोन तासांच्या नाशिक दौऱ्यासाठी एवढ्या जड बॅगा का घेऊन आले..? आणि त्या बॅगांमध्ये काय होते..? असे सवाल त्यांनी केले होते. तर, ट्विट करत राऊत यांनी “मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण..! नाशिकमध्ये सध्या रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस..” असे नाशिकमध्ये पैसे वाटप होत असल्याचे आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केले होते.
दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या या आरोपानंतर आज पुन्हा नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बॅगांची पोलिसांनी तपासणी केली.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या प्रचारार्थ रोड शो करणार आहेत. त्यासाठी ते आज पुन्हा हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आले असता, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर पुढे निघून गेले. मात्र, मागून येणाऱ्या त्यांच्या बॅगा घेऊन येणाऱ्या लोकांना थांबवले आणि पोलिसांनी त्या सर्व बॅगा उघडून त्यांची कसून तपासणी केली.
Sanjay Raut | मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले.!; मुख्यमंत्र्यांच्या गार्डसच्या हातात पैशांच्या बॅगा..?
Eknath Shinde | बॅगांमध्ये काय आढळले..?
यावेळी या बॅगांमध्ये काही कॅमेऱ्याचे साहित्य व इतर तांत्रिक गोष्टी आढळल्या. संजय राऊत यांच्या त्या आरोपांनुसार शिंदेंच्या बॅगांमध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा आर्थिक बाबी आढळून आल्या नाहीत. तर, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या बॅग तपासत असताना त्यांची रितसर शुटिंगही केली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या या कृतीतून कुठलाही शब्दही न काढता त्यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांना चांगलीच चपराक लगावली आहे. मात्र, हा सर्व प्रकार म्हणजे एकनाथ शिंदेंनी ठरवून केलेली नौटंकी असल्याची टीकाही विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते व ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नऊ बॅगांमधून तब्बल १२ ते १३ कोटी रुपये नाशिकमध्ये आणल्याचे आरोप संजय राऊत यांनी केले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टरमधून उतरतानाचा आणि त्यांच्या बॅगा घेऊन जाणाऱ्या अंगरक्षकांचाही व्हिडिओ शेअर केला होता.
Sanjay Raut | नाशिक महापालिकेत मोठा गैरव्यवहार..?; थेट मुख्यमंत्र्यांना लाभ..?
संजय राऊतांचा आरोप काय..?
“जेव्हा मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण..! नाशिकमध्ये आता रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस… केवळ दोन तासांच्या नाशिक दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक इतक्या जड बॅगा का वाहत आहेत..? यातून नेमका कोणता माल नाशिकला पोहचला आहे.? निवडणूक आयोग ही फालतू नाकाबंदी व झडत्या घेत आहे. मात्र, इकडे महाराष्ट्रात तर, अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी सोबत आणलेल्या बॅगांमध्ये १२ ते १३ कोटी रुपये असल्याचा आरोप संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम