Skip to content

राज्यात भाजपची सत्ता येणार ‘या’ महंतांचे नाशिकमध्ये वक्तव्य


नाशिक : राज्यात भूकंप घडला असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे सध्या अनेक आमदारांसह सुरतमध्ये (Surat) आहेत. शिंदेंसह सर्वजण आहेत ते सर्वजन सुरक्षित राहोत. राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार असून भाजपाचा मुख्यमंत्री होईल असे वक्तव्य सुर्यापीठ गुरूस्थान मुरली आश्रम द्वारकाचे पीठाधीश्वर कृष्णदेवनंद गिरी जी महाराज यांनी वक्तव्य केलं आहे.

महाराज म्हणाले राज्यात सत्तांतर होणार असून एकनाथ शिंदे यांच्यासोबत 21 आमदार आता सुरत मध्ये असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भाजपच्या सहकार्याने सरकार स्थापन होण्यासाठी हे सर्व सुरु असल्याचे ते याप्रसंगी म्हणाले. मात्र आधायत्मिक महाराजांनी असे राजकीय भूमिका घेणे किती योग्य आहे हे कठीण आहे.

महाराज म्हणाले की छत्रपती शिवरायांनी सुरतेवर जाण्यापूर्वी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले होते. त्याच उद्देशाने मी एकनाथ शिंदे यांच्या वतीने प्रार्थना केली आहे. आता त्यांच्याकडे एकवीस आमदार आहेत असा दावा त्यांनी केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे महाराज आज नाशिक मध्ये बोलत होते


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!