Eklahare Thermal Power Station | नाशिकमधील ७० ते ८० गावांची ‘बत्ती गूल’

0
25
Eklahare Thermal Power Station
Eklahare Thermal Power Station

नाशिक :  नाशिकमध्ये काल मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली असून, वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या या पावसामुळे ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली तर काही ठिकाणी रस्त्यांवरील वीजेचे खांब कोसळले आहेत. तर, देवळा तालुक्यात या अवकाळी पावसामुळे वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला असून, शेड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एक महिला आणि साडे तीन वर्षीय चिमुरडा जखमी झाल्याची माहीती आहे. तसेच नाशिक येथील एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रालाही (Eklahare Thermal Power Station) पावसाचा तडाखा बसल्याने नाशिक शहरासह आजूबाजूचा परिसरात काल रात्रीपासून अंधारात आहे.

काल रात्रीपासून काही गावांचा वीज पुरवठा खंडित (Power supply cut off) झाला होता. तर, सकाळीही शहरातील काही भागांत वीज पुरवठा खंडित होता. तर, एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये (Transformer) तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे.

Dada Bhuse | खचून जाऊ नका सरकार तुमच्यासोबत; तातडीने पंचनामा करण्याचे मंत्री भुसेंचे निर्देश

Eklahare Thermal Power Station | ७०-८० गावांचा वीज पुरवठा खंडित 

दरम्यान, मध्यरात्री झालेल्या या वादळी वाऱ्याच्या अवकाळी पावसामुळे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटला होता. त्यामुळे नाशिकच्या शहरी भागासह ७० ते ८० गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे. वीजनिर्मिती केंद्रातील १३२ के.व्ही. सब स्टेशनमधील महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटल्यामुळे हा वीज पुरवठा खंडित झाला होता. तर, आता हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. (Eklahare Thermal Power Station)

Deola | देवळा तालुक्यात वीज पडल्यामुळे दोघांचा मृत्यू तर, कांदा शेड्स व घरांचेही नुकसान

चांदवडमध्ये कार वाहून गेली

नाशिक शहरासह ग्रामीण भागात मालेगाव (Malegaon) शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात मालेगाव परिसरातील काही झाडं कोसळली. तर, चांदवड (Chandwad), देवळा (Deola) तालूक्यात जोरदार पाऊस बरसला असून चांदवड शहरात सोमवार पेठ परिसरात रस्त्यांवरुन जणू नदी वाहत होती. तर, रस्त्यावरील या जोरदार पाण्याच्या प्रवाहात रस्त्यावर उभी असलेली एक कार या पाण्याच्या प्रवाहात उलटी वाहून गेली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here