राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार ता.१६ इगतपुरी पंचायत समिती कार्यालयात जाऊन एकदिवसीय कामबंद आंदोलन केले.या आंदोलनात इगतपुरी तालुक्यातील जवळपास तीस पस्तीस समुदाय आरोग्य अधिकारी सहभागी होते.या आंदोलनास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याचा दावा महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ पंकज पवार यांनी केला आहे.
विधान परिषदेची आचारसंहिता असल्या कारणाने संघटनेला जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठीची परवानगी नाकारली होती.या कारणास्तव जिल्हाध्यक्ष पवार यांनी सर्व सर्व शिष्टमंडळासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेत त्यांना निवेदन देखील दिले.
जिल्हाध्यक्ष डॉ पंकज पवार यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी यांनी या एकदिवसीय आंदोलनाला चांगला प्रतिसाद दर्शविला असाच काहीसा प्रतिसाद इगतपुरी तालुक्यात पाहायला मिळाला. सोमवार ता.१६ संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ पंकज पवार यांचे मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुक्यातील जवळपास तीस पस्तीस समुदाय अधिकारी वर्गाने इगतपुरी पंचायत समिती कार्यालयात जाऊन अतिरिक्त गट विकास अधिकारी महेंद्र भुसारे यांना विविध मागण्यांसंदर्भात कामबंद आंदोलनाचे निवेदन शांततेत देण्यात आले.
इगतपुरी तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.तुषार निकम व डॉ.अमोल साळुंखे यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी,नाशिक तसेच प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी इगतपुरी.डॉ.शैलेश निकम यांची भेट घेऊन समुदाय आरोग्य अधिकारी यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी समस्या व मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली.
या आंदोलनास इगतपुरी तालुका महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे इगतपुरी तालुका अध्यक्ष श्री.उपेंद्र अहिरे ,उपाध्यक्ष डॉ.सतिष गवई,सचिव डॉ.रविंद्र क्षिरसागर,सहसचिव डॉ.निखिल चित्ते,कोषाध्यक्ष्य डॉ.दिपक घोरपडे,डॉ.नितीन बडगुजर ,महिला प्रतिनिधी डॉ.मनिषा मानकर ,डॉ.पुजा पगारे ,कु.कोमल ब्राह्मणे,श्रीम.भाग्यश्री घरटे,तालुका संघटक श्री.अक्षय माघाडे,श्री.बाजीराव माळोदे,तालुका प्रतिनिधी डॉ.तेजस्विनी मेदडे,डॉ भारती फुले आदींसह सर्व सदस्य उपस्थित होते.
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राज्य भरातील समुदाय आरोग्य अधिकारी उत्तम रीतीने सेवा प्रदान करीत आहे.प्रामाणिकपणे आपले सेवा प्रदान करीत असतांना समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या विविध अडचणी आर्थिक नुकसान मनोबलाचे खच्चीकरण करीत आहे. या समुदाय अधिकाऱ्यांचे मनोबल कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या मागण्या पूर्ण करणे अग्रक्रमाने सोडविणे आवश्यक आहे.यासाठीच सर्व जिल्हाभर राज्यभरात समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी एकदिवसीय कामबंद ची हाक दिली होती.
संघटनेच्या या आहेत मागण्या
समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सेवेत कायम करून गट ब अधिकाऱ्यांचा दर्जा मिळावा. केंद्र शासनाच्या मार्गदशक सूचना प्रमाणे चाळीस हजार मानधनावर वार्षिक वेतनवाढ व अनुभव बोनस मिळावा,निश्चित वेतन व कामावर आधारित वेतन यांचे प्रमाण बदलून निश्चित वेतन छत्तीस हजार रुपये (९०%) व कामावर आधारित वेतन चार हजार रुपये (१०%) करण्यात यावा. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात धोरण निश्चित करावे,केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बढती देण्यात यावी. प्रवास व इतर भत्ते मिळावे, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण मिळावा आदी संघटनेच्या मागण्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम