इगतपुरीचा पूर्व भाग तीन दिवसांपासून अंधारात ; जनजीवन विस्कळीत

0
129

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याचा पूर्व भाग गेल्या तीन चार दिवसांपासून अंधारात असून या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

तालुक्याच्या पूर्व भागातील परदेशवाडी 33 के.व्ही उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या तीस गांव वाड्या पाड्यांना तीन दिवसांपासून लाईट नसल्याने पिण्याचे पाणी, पिठाच्या गिरण्या बंद झाल्याने जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पडणाऱ्या पावसामुळे आवणीचा जोरात मोसम चालू आहे. पण जेवणासाठी भाकरीला पिठच नसल्याने सर्वांचेच हाल होत आहेत.

मोबाइल डिस्चार्ज झाले आहेत.सद्या बारावी पास झालेल्या मुलांच्या विविध प्रकारच्या इंजीनियरिंग, मेडिकल च्या परीक्षा चालू आहेत. सर्व परीक्षांचे वेळापत्रक online येत असल्याने मुलांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत आहे.

75 व्या स्वातंत्र्याचा उत्सव मोठ्या प्रमाणात चालू आहे. रोज नवनविन माहीती शासन स्तरावरून येत आहे.मोबाईल डिस्चार्ज झाल्याने काय चालले आहे काहीच कळत नाही.तीन दिवसांपासून या परिसरातील संपर्क तूटला आहे ज्यांच्याकडे इनव्हर्टर आहे ते तीन दिवस पुरेसे नाही आहे.ते ही लो झाले आहे.

ईगतपुरी घोटी येथून 33 के.व्ही लाईन परदेशवाडी सबस्टेशन ला येते.सद्या या लाईनचे पोल पडले, तारा तुटल्याने विद्युत पुरवठा गेल्या तीन चार दिवसांपासून खंडीत आहे.

टाकेद, खेड, बारशिंगवे सोनोशी शिरेवाडी मायदरा बांबळेवाडी घोडेवाडी, आंबेवाडी, मांजरगाव खडकेद इंदोरे वासाळी, अडसरे बुद्रुक, अधरवड, बेलगांव त-हाळे, पिंपळगाव मोर अशा अनेक गावांना परदेशवाडी 33 के. व्ही उपकेंद्रातून विद्युत पुरवठा होतो . खेड-परदेशवाडी, बारशिंगवे, टाकेद, बेलगांव त-हाळे हे चार फिडर या परिसरासाठी आहेत. व उभाडे येथे समृध्दीच्या खड्डी क्रेशर व विविध यंत्रसामुग्री साठी येथूनच लाईट पुरवठा केला जातो.

या सबस्टेशन ला घोटी येथून 45 वर्षापुर्वीची जुनाट विद्युत लाईन वापरात आहे. पुर्वीची भंडारदरा 33 के.व्ही वाहीणी या सबस्टेशन ला जोडली आहे. जुनाट लाईनीमुळे सतत पोल पडणे,सडलेले पोल बदलणे तारा तुटणे हे कायम चालू आहे.या भागाला मुलभूत सुख सोयींनी नेहमीच ग्रासले आहे.रस्ता विज पाणी याकड़े आमदार खासदारांनी लक्ष देने अत्यंत गरजेचे आहे.

अकरा के.व्ही. लाईनचे पोल टाकेद भागात मरणकळा भोगत आहेत.जसे बील वसुली करता तशी सेवाही देने महावितरणचे काम आहे.टाकेद हा मोठा परीसर असूनही येथे वायरमनची पदे रिक्त आहेत.एकच वायरमन सर्व परिसर सांभाळत आहे परिणामी वायरमन कर्मचारी देखील हतबल होतात.अनेक भागात डि पी वरचा फेज टाकण्यासाठी पुर्ण फिडर बंद करावे लागते. काळानुरूप बदल होने गरजेचे आहे. बीलं वाढली पण त्या प्रमाणात विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही. या मुळे जनता त्रस्त आहे. तरी विद्युत विभागाचे वाढीव कर्मचारी देऊन या परिसरातील विद्युत सेवा लवकरात लवकर सुरळीत चालू करावी अशी मागणी सर्वत्र परिसरातून होत आहे.

“ग्रामपंचायत चे पाणी तीन दिवसापासून लाईट नसल्याने बंद आहे. नदि नाले यांचे पाणी पिण्यात आल्यास रोगराई वाढू शकते.पिठ गिरण्या बंद आहेत. आमच्या भागात सतत विद्युत पुरवठा खंडीत असतो या कड़े संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे.व त्वरीत विद्युत पुरवठा सुरळीत करावा. विद्युत पुरवठा बंद चालू करण्यासाठीचे परमिट घेणे देण्यासाठी सबस्टेशन वर सक्षम कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.
ताराबाई रतन बांबळे सरपंच टाकेद बु.

“गेल्या तीन दिवसांपासून लाईट नसल्याने MSCIT सह मेडिकल आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे न भरून येणारे मोठे नुकसान झाले आहे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन परिक्षांवाचून वंचित राहावे लागले आहे.”
वसंत नाठे , जनता कॉम्प्युटर टाकेद बु.

“गेल्या तीन चार दिवसांपासून सर्व वीज वितरण कर्मचारी रात्रंदिवस जोरदार वाऱ्यासह बरसत असलेल्या पावसात विद्युत पुरवठा चालू करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.विद्युत पुरवठा चालू करण्यासाठी सर्वच कर्मचारी तीन दिवसांपासून शर्तीचे प्रयत्न करत आहे.वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले असल्याने सबस्टेशन सह 33 kv लाईनध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला होता.”
साकेत पाटील , वीज वितरण अभियंता घोटी ग्रामीण.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here