सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असतांना या खड्डेमय रस्त्यांकडे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा संबंधित प्रशासनासह कुणीच लक्ष्य देतांना दिसत नाही.
या खड्डेमय रस्त्यांचा जीवघेणा त्रास गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक प्रवाशी वाहनधारकांना सहन करावा लागतो आहे. हा रस्ता प्रश्न तात्काळ सोडवावा यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे व सहकारी मित्र परिवाराने इगतपुरी तालुका देवा ग्रुप च्या वतीने शनिवार ता.०६ दरम्यान इगतपुरी तालुका विद्यार्थी महासंवाद महासंपर्क अभियान दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांना घोटी येथील ग्रँड परिवार हॉटेलमध्ये भेट घेत देण्यात आले. दरम्यान इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील रस्ता प्रश्न तात्काळ सोडवू असे अमित ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना आश्वसित केले येत्या काही दिवसांतच इगतपुरी तालुक्यातील सर्वच रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पवित्रा घेईल असे मनसे जिल्हाउपाध्यक्ष संदीप किर्वे,विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रताप जाखेरे यांनी यावेळी बोलतांना म्हंटले.
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातून शेकडो विद्यार्थी महाविद्यालयिन शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जात असतात व तालुक्याच्या ठिकाणाहून देखील टाकेद येथे बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी रोज ये जा करतात परंतु खड्डेमय रस्त्यांमुळे विद्यार्थी शाळा महाविद्यालयात नियमित वेळेत पोहचत नाही.यामुळे विद्यार्थ्यांचे न भरून येणारे शैक्षणिक नुकसान होत आहे.गेली दहा वर्ष झालीत पूर्व भागात सर्वच रस्त्यांची दुरवस्था आहे नेमकं रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हे समजत नाही त्यात या रस्त्याने जायचं म्हंटल की नेमकं गाडी चालवतो आहे की बैलगाडी असा प्रश्न वाहनधारकांना पडतो आहे.त्यात रस्त्यासवरील मोठं मोठ्या खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना वाहन चलवतांना खड्यांचा अंदाज येत नाही यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. आणि हाच खड्डेमय जीवघेणा। रस्ता प्रश्न सातत्याने स्थानिकांना सतावतो आहे.सत्तेचा कायापालट झाला परंतु रस्त्यांचा कायापालट केव्हा होणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांसमोर उभा आहे.
या खड्डेमय रस्त्यांच्या वाहाताहतीमुळे प्रवाशी,वाहनधारक, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, व्यवसायिक, पर्यटक, भविकभक्तगण, शिक्षकवृंद, नोकरदार वर्ग,शेतकरी चाकरमान्यांना जीव धोक्यात घालून ना विलाजास्तव धोकादायक प्रवास करावा लागतो आहे. तरी येत्या काही दिवसांत हा रस्ता प्रश्न मार्गी लागला नाहीच तर मनसे स्टाईलने अनोखे आंदोलन करून उत्तर देण्यात येईल असा इशारा इगतपुरी तालुका मनसे पदाधिकाऱ्यांसह देवा ग्रुप फाउंडेशनने दिला आहे.
टाकेद ते धामणगाव व पिंपळगाव मोर ते वासाळी या रस्त्यांसंदर्भात मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांना निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे,मनसे कार्यकर्ते किरण साबळे,देवा ग्रुप चे चंद्रकांत भाऊ ईदे,प्रथमेश खोल्लम,गणेश मेमाणे,युवराज चव्हाण, विशाल कडवे,रोहित भगत, तेजस लंगडे,कल्पेश भगत,पप्पू गाढवे,सागर गाढवे,कोंडाजी तातळे,विठ्ठल वारुंगसे आदी उपस्थित होते.
“टाकेद-धामणगाव रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे रोज शेकडो शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना खड्डेमय रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करत मार्गक्रमण करावे लागत आहे.येत्या काही दिवसांत हा रस्ता प्रश्न तात्काळ सुटला नाही तर लवकरच राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेत सर्वच रस्त्यांसंदर्भात निवेदन देणार आहे.
– राम शिंदे सामाजिक कार्यकर्ते टाकेद बु.
“पिंपळगाव मोर ते वासाळी रस्ता आशियाई बँकेच्या अर्थसहाय्य मार्फत मंजूर आहे.त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.एजेंन्सि व काही तांत्रिक अडचणीमुळे थोडा विलंब होत असून येत्या दोन महिन्यांच्या आत या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल.तसेच टाकेद ते धामणगाव रस्त्या खासदार व आमदार यांच्या प्रयत्नामुळे काँक्रीटकरण मंजूर आहे.भैरव कडलग यांच्या एजेंन्सिकडे या रस्त्याचे काम देण्यात आले आहे.येत्या काही दिवसांत लगेचच टाकेद-धामणगाव रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल.”
–कौस्तुभ पवार ,अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक
“येत्या काही दिवसांत टाकेद-धामणगाव रस्त्यासह अन्य रस्त्यांचा प्रश्न जर प्रशासनाने सोडवला नाहीच तर मनसे स्टाईलने आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन छेडण्यात येईल.”
– किरण साबळे ,मनसे कार्यकर्ते अडसरे बु.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम