Nashik : राज्यात पुन्हा एकदा ईडीचे धाडसत्र ; या बडया नेत्याच्या संबंधातील बँकेवर छापा….!

0
53

Nashik : राज्यात पुन्हा एकदा ईडी ने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. आज पुन्हा 14 ठिकाणी ईडीने छापेमारी केलीये. यात राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयाचाही समावेश आहे.

राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयासह पश्चिम महाराष्ट्रात एकूण 14 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. ही बँक राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित आहे. 10 वर्षांपूर्वीच्या 1000 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचा तपास ईडी करत आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाती उघडून मोठी रक्कम रोकड स्वरुपात वळती केल्याचा आरोप बँकेवर आहे. हे व्यवहार बँकेने लपवून ठेवल्याचा आरोप आहे. या कथित घोटाळ्यात बँकेचे अधिकारी सामील असल्याचा संशय ईडीला आहे.

तीन ते चार दिवसांपूर्वी ईडीने मुंबईमध्ये जवळपास पंधरा ठिकाणी छापेमारी केली होती. यामध्ये कोट्यावधी रुपयांच घबाड ईडीच्या हाती लागल्यानंतर पुन्हा एकदा अचानक पणे कारवाई करत राजारामबापू सहकारी बँकेवर छापेमारी केली आहे. यामध्ये देखील मोठा घोटाळा उघड येण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here