गंगापूर रोडवर इलेक्ट्रिक बाईकने घेतला पेट; जीवितहानी सुदैवाने टळली

0
7
e bike

नाशिक : आज दुपारच्या सुमारास गंगापूर रोडवरील वर्दळीचा परिसर असलेला विद्याविकास सर्कल येथे एका इलेक्ट्रिक बाईकने अचानक पेट घेतल्याचा घटना घडली. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अशीच एक ई-बाईक शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गंगापूर रोडजवळील विद्याविकास सर्कल येथील एका फुटपाथवर उभी होती. मात्र, काहीवेळाने अचानक तिने पेट घेतला होता. यावेळी स्थानिक व्यावसायिकांनी अग्निशमन पावडरचा मारा करत ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दाखल झालेल्या अग्निशमन बंबाने दुचाकीला लागलेली आग पूर्णपणे विझविली. सुदैवाने ह्या गाडीच्या आसपास कोणी व्यक्ती उभी नसल्याने व ह्या गाडीचा चालक नसल्याने जीवितहानी टळली आहे. रवींद्र आव्हाड असे या ई-बाईकच्या मालकाचे नाव आहे. ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित आरडाओरड करत नागरिकांना बोलावले.

दुचाकीने अचानक पेट घेतल्याने गंगापूर रोड परिसरात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, पेट घेतलेली दुचाकी पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे परिसरातील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. गंगापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शहरात ई-बाईक्स जळण्याच्या घटना सुरु आहे. कधी तांत्रिक कारणांमुळे, तर कधी सदोष बॅटरी यांमुळे ह्या ई-बाईक्स पेट घेत आहेत. त्यामुळे आता ई-बाईक्स चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here