Maharashtra politics| आता पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून अनेकजणांनी कंबर कसली आहे. तिन्ही पक्षांचे आमदार मंत्रीपद मिळावं म्हणून देवाला साकडे घालत असतांना. दुसरीकडे रिपाइं नेते रामदास आठवले यांनीही एका मंत्रीपदाची मागणी केली आहे. त्यामुळे या विस्तारात कुणाला संधी मिळणार आणि कुणाची संधी हुकणार ह्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
पण यातच आता राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यताच जणू देसाई यांनी वर्तवल्याने राजकारणात एकच गोंधळ उडाला आहे. देसाई यांनी मीडियासोबत बोलताना हा दावा केला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शरद पवार गटातील अनेक नेते संपर्कात आहे. हे नेते अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असावा, असा दावाच शंभूराज देसाई यांनी केलाय.
Deola | देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ…
दिवाळीत काही नेत्यांना मिठाई…
दसरा-दिवाळीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी उलथापालथ होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. यावेळी दिवाळीत मोठा धमाका होणार आहे. राज्याच्या राजकारणात विरोधकांसाठी मोठा भूकंप होणार आहे, असा गौप्यस्फोटही शंभूराज देसाई यांनी यावेळी केला. त्यामुळे आता शरद पवार गटातील कोणता नेता अजित पवार गटात येणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. किती नेते येणार? नेत्यांचा आकडा हा गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. पण राज्यात मोठा भूकंप होणार असल्याचं जणू त्यांनी जाहीरच केलंय. आधी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आणि आता ह्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दाव्यात काय तथ्य?
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. हा विस्तार कुठल्या ना कुठल्या कारणामुळे टाळण्यात किंवा पुढे ढकलण्यात आला. विस्तार होणार असेच फक्त सांगण्यात येत होते. पण कधी होणार हे कोणीही सांगितलेलं नव्हतं. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील इच्छूक नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता होती. पण नंतर थेट अजित पवार आणि त्यांच्या सहकारी नेत्यांचा शपथविधी झाला. अजित पवारांचा गट भाजप सरकारला येऊन मिळाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. त्याबरोबरच मंत्रिमंडळ विस्तार का लांबणीवर टाकला जात होता याचंही उत्तर मिळालं होतं. आताही केवळ विस्तार होणार इतकंच सांगितलं जातंय.
त्यात आता शरद पवार गटातील नेते महायुती सरकारमध्ये येणार असल्याचे देसाई यांनी सांगितलं. त्यामुळे देसाई यांच्या या डाव्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे राजकीय जाणकारांचं म्हणण आहे. शिवाय शंभूराज देसाई हे हवेतील गप्पा मारणाऱ्यांपैकी नाहीत. ठोस बोलणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळेही त्यांच्या दाव्यात तथ्य असल्याचंही बोललं जात आहे. (Maharashtra politics)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम