DS Baba: बाबा या नावाने जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता. प्रत्येक संधीतून क्षमता सिद्ध करण्याचे कौशल्य बाबांच्या अंगी होते. देवळा सारख्या गावात त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. त्यांचा प्रवास हा मंत्री पदापर्यंत पोहचला. जिल्ह्यासाठी आहेर यांनी मंत्री असताना व नसतानाही केलेले कार्य आजही सर्वासाठीच मार्गदर्शक राहिले आहे. याच बाबांचा आज जन्मदिनी घेतलेला आढावा. (DS Baba)
Gas price: सणासुदीत गॅसचा भडका ! सलग दुसऱ्या महिन्यात गॅस सिलिंडर महागला
राजकारण म्हटल की आजच्या घडीला नकोसे वाटणारे मात्र याच राजकारणाने अनेक हेविवेट नेते या महाराष्ट्रात दिलेत. राजकारणात तशी संधी बऱ्याच जणांना मिळते. परंतु, ते कार्यकर्ता म्हणून राहतात की स्वतःला सिद्ध करून वरच्या पदावर पोहचता हे ज्याच्या त्यांच्या कौशल्यावर आहे. बाबांनी मात्र मिळालेल्या संधीतून स्वतःला सिद्ध केले. कर्तृत्वाने आपली कार्याची चुणूक त्यांनी दाखवून दिली. बाबांनी आमदार, खासदार, मंत्री अशा महत्वाच्या पदांवर काम केले, तिथे त्यांनी आपली कर्तुत्वाने स्वतःला सिध्द केल. देवळा तालुक्याने महाराष्ट्राला दिलेले हे बाबारुपी रत्न आज आपल्यात नाही हे आपले दुर्दैव. (DS Baba)
शेतकऱ्यांचं पोरग आमदार होतय पुढे जावून मंत्री होतय हे तत्कालीन कळवण आणि आताच्या देवळा तालुक्याने पहिल्यांदाच अनुभवले होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेतले. बाबांनी ठरवले असते तर शिक्षणानंतर पुण्यात अथवा मोठ्या शहरात आपले रुग्णालय उभारत सेवा दिली असती मात्र त्यांच्या हृदयात आणि मनात आपला तालुका आणि आपला जिल्हा होता. म्हणून त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर नाशिकला परतून रुग्ण सेवा सुरू केली. याच काळात जिल्हा परिषद निवडणुकीतून त्यांचे राजकारणात पदार्पण झाला. देवळा जि. प. गटातून त्यांनी पहिली निवडणूक लढविली. मात्र, त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर शांत बसतील ते बाबा कसले त्यांनी अधिक जोमाने कामाला सुरवात करत १९७५ मध्ये शरद जोशींच्या शेतकरी संघटनेची देवळा येथे स्थापना करत पुढील काही वर्ष विविध प्रश्नांवर आंदोलने केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचं पोरग काय करू शकत हे दाखवून दिले. या काळात विरोधी पक्षनेते उत्तमराव पाटील यांच्याशी बाबांचे संबंध आले आणि त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. दरम्यान १९८५ साली बाबांना पुलोद आघाडीच्या माध्यमातून नाशिक मतदार संघातून विधानसभेची संधी मिळाली आणि त्यांनी विजयी पताका फडकवली. आमदारपदी आरूढ झाल्यावर त्यांनी विकास कामांना प्राधान्य दिले त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सर्वसामान्यांच्या कामांचा निपटारा सुरूच होता. अन्यायाविरुध्द थेट भिडणारा, भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगणारा आक्रमक आमदार नाशिककरांनी अनुभवला याच काळात बाबांनी आमदार निधीतून प्रचंड विधायक काम केलीत त्याची नागरिकांना आजही जाणीव आहे.
आमदार असताना बाबांनी नाशिक महानगरपालिकेतील औषध खरेदी भ्रष्टाचार प्रकरण बाहेर आणले. जिल्ह्यात आमदार निधीतून समाज मंदिरे बांधण्याची परंपरा बाबांनीच सुरू केली. जनतेसाठी भांडणारा आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. बाबांची कामगिरी लक्षात घेऊन भाजपने १९८९ मध्ये खासदारीची उमेदवारी दिली. नाशिककरांनी त्यांना स्वीकारले आणि बाबांना लोकसभेत पाठविले. बाबांनी खासदार झाल्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष लक्ष दिले. द्राक्षे व कांद्यासाठी जादा व्ॉगनच्या मागणीसाठी रेल रोको आंदोलन खासदार असताना केले. आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. बाबांनी या काळात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या विषयांवर लक्ष केंद्रित केले. बाबांनी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद देखील भूषविले यावेळी ग्रामीण भागातील शाळांना सुसज्ज इमारत उभारण्याच्या कार्याला गती दिली .
बाबांचे महत्वाचे कार्य म्हणजे वसंतदादा सहकारी साखर कारखाना उर्जितावस्थेत आणण्यासाठी कणखर निर्णय घेतले. यावेळी नफा देणारा आसवनी प्रकल्प देखील बाबांनी उभा केला. कसमादे पाणी टंचाई हा पण त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यासाठी सर्वपक्षीयांना एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. युती शासनाच्या काळात चणकापूर उजव्या कालव्याचे काम पूर्णत्वासाठी तसेच रामेश्वरपासून पुढील वाढीव कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी अखेपर्यंत बाबा झटत राहिले. ज्या योजनेवर आज राजकारण सुरू आहे त्या नार-पार नद्यांच्या उगमस्थानी मांजरपाडा प्रकल्पासाठी त्यांनी त्याकाळी दूरदृष्टी ठेवत प्रस्ताव तयार केले. गिरणा खोऱ्यातील पाणी साठा वाढविणे हे त्यांचे महत्वाकांक्षी काम होते. तापी खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदावर असताना त्यांनी मांजरपाडा प्रकल्पासाठी केला.
बाबा युती सरकारमध्ये आरोग्यमंत्री झाले आणि त्यांनी आपली प्रशासकीय क्षमताही सिध्द केली. नाशिकच्या वैभवात भर पडणाऱ्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना आज लाखो गोरगरीबांना ज्या रुग्णालयाचा आधार आहे ते संदर्भ सेवा रुग्णालय तसेच जिल्हा व ग्रामीण रुग्णालयांची सुधारणा यासारखी अविस्मणीय कामे बाबांनी केली. बाबा मंत्रीपदावर असताना महत्वाचा असा महामार्गावर अपघात वैद्यकीय सेवा केंद्र, गरिबांसाठी जीवनदायी योजना, आदिवासी महिलांसाठी मातृत्व अनुदान योजना सुरू करून महत्वाकांक्षी निर्णय घेतला.
बाबांनी ज्या गावाला घडवलं त्या देवळा तालुक्याची देखील निर्मिती केली. देवळा शहर व परिसरातील बिनशेती पट्टी कमी करून अनेकांना दिलासा दिला. विकास कामे सुरूच होते मात्र त्यानंतर झालेल्या २००४ च्या विधानसभा निवडणुकीत बाबांच्या नशिबी पराभव आला. त्यांनी भाजपला सोडचि्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद भूषविले.
तुझा देवळा आता तालुका झाला….!
बाबांच्या आठवणी सांगताना त्यांचे खऱ्या अर्थाने राजकीय वारसदार असलेले बाबांचे पुतणे केदा आहेर यांच्याशी बोललो असता ते यावेळी भावूक झाले. नाना म्हणाले की बाबांचा सर्वाधिक सहवास हा मला लाभला, सत्ता असो नसो बाबांच्या हाकेला मी नेहमी पुढे असायचो, बाबांनी मला पुतण्या म्हणून किंवा मी काका म्हणून आम्ही एकमेकांकडे कधीही पाहिले नाही. आमचे अतिशय जिव्हाळ्याचे सबंध होते. ग्रामपंचायत, नगरपालिका, बाजार समिती, वसाका या सर्व निवडणुकीची जबाबदारी बाबांनी माझ्यावर सोडली आणि ती मी लीलया पेलली, मला नेहमी वाटायचं की माझं गाव आता तालुका व्हायला हवा अन् नेमक बाबांचा एकेदिवशी कॉल आला बाबा म्हणाले “तुझा देवळा आता तालुका झाला” माझ्या कानावर हे शब्द पडताच मी भारावून गेलो आजही ते शब्द त्या आठवणी मी कायम स्मरणात ठेवल्या आहेत त्या मी कधीही विसरू शकत नाही. बाबांचा तो कॉल माझ्यासाठी कायम स्मरणात राहील…..
– केदा आहेर, भाजपा नेते
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम